RIP Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत च्या पोस्टमोर्टम रिपोर्ट नुसार गळफासानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट; कोरोना चाचणीतुन झाले 'हे' निदान

याठिकाणी पोस्टमोर्टम सहितच त्याची कोरोना चाचणी सुद्धा घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून यात सुशांतला कोरोना (Coronavirus Test) नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) याने काल वांद्रे (Bandra) येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या 34 व्या वर्षी त्याच्या निधनाची बातमी ही फॅन्ससहित समस्त बॉलिवूड साठी सुद्धा मोठा धक्का होती. सुशांतने मानसिक नैराश्यातून हे मोठे पाऊल उचलले असल्याचे म्हंटले जातेय, मात्र अद्याप त्याच्या या निर्णयामागचे खरे कारण समजलेले नाही. दरम्यान, जुहू मधील कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) काल सुशांतचा मृतदेह पोस्टमोर्टम साठी पाठवण्यात आला होता. याठिकाणी पोस्टमोर्टम सहितच त्याची कोरोना चाचणी सुद्धा घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून यात सुशांतला कोरोना (Coronavirus Test) नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच पोस्टमॉर्टमच्या अहवालात ऑटोप्सी, गळफास घेतल्याने श्वास कोंडल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचा मृत्यू हा गळफास लावूनच झाल्याचे सुद्धा सांगितले गेले आहे.अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना

सध्याच्या अपडेटनुसार आज, सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर मुंबई मध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत. काल रात्री सुशांतचे वडिल आणि इतर कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आहेत. Sushant Singh Rajput Commit Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ही' होती शेवटची पोस्ट

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. अलीकडेच त्याचा छिछोरे हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, ज्यात त्याने एका मध्यमवयीन वडिलाची भूमिका करत आपल्या मुलाला जगण्याची प्रेरणा दिली होती असे कथानक होते. आत्महत्या हा कधीच पर्याय नसतो हे सिनेमात सांगणाऱ्या सुशांतची खऱ्या आयुष्यातील अशी एग्झिट निश्चितच चटका लावून जाणारी आहे.