Ragini MMS Returns सीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' (Ragini MMS Returns) चित्रपटामध्ये काम करणार आहे. सनीने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'रागिनी एमएमएस 2' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात सनीवर चित्रित झालेले 'बेबी डॉल' हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' मध्ये सनी लिओनी एका खास भूमिकेत दिसणार आहे. यात सनी स्पेशल डान्स 'हॅलो जी' मध्ये दिसणार आहे. हे गाणं मीत ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले आहे.

Sunny Leone (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) लवकरच 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' (Ragini MMS Returns) चित्रपटामध्ये काम करणार आहे. सनीने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'रागिनी एमएमएस 2' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात सनीवर चित्रित झालेले 'बेबी डॉल' हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' मध्ये सनी लिओनी एका खास भूमिकेत दिसणार आहे. यात सनी स्पेशल डान्स 'हॅलो जी' मध्ये दिसणार आहे. हे गाणं मीत ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले आहे.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत सनीशिवाय रागिनी एमएमएस रिटर्न्स? होऊ शकत नाही ! असे लिहिले आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स चित्रपटामध्ये सनीसोबत वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल दिसणार आहे. (हेही वाचा - अभिनेत्री गहना वशिष्ठ वेब सीरिजचं शूटींग करताना सेटवरून कोसळली; रुग्णालयात देतीय मृत्यूशी झुंज)

सनी लिओनी इन्स्टाग्राम पोस्ट - 

 

View this post on Instagram

 

Sunny ke bina #RaginiMMSReturns ?? No way!! I'm coming to double up those sexy thrills! #HelloJi, care to join me? ALT aur Zee pe mein aa rahi hu to add the chamak, dhamak and lots of namak! @ektaravikapoor @altbalaji @divyaagarwal_official @varunsood12 @zee5premium

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

काही दिवसांपूर्वी दिल्ली बुल्स संघानं आपली जर्सी, गाणं आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर यांची घोषणा केली होती. या संघाने दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या जर्सीचे अनावरण केले. दिल्ली बुल्स या संघासोबत पहिल्यांदाच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री सनी लिओनीची निवड करण्यात आली आहे. सनी लिओनी हिची पहिल्यांदाच क्रिकेट संघाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now