Google Trends 2019 ने दुर्लक्ष करूनही, Sunny Leone ठरली गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेली सेलिब्रिटी
सर्च इंजिन गूगलने सर्च केलेल्या Top 10 सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला नाही.
जवळजवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कोण देऊ शकेल? तर तो आहे गुगल सर्च इंजिन (Google Search Engine). लोकांचा गुगलवर इतका विश्वास आहे की, जेव्हा कोणत्याही प्रकारची शंका किंवा प्रश्न मनात येतो तेव्हा लोक त्याचे निराकरण गुगलच्या मदतीनेच करतात. बातम्या, करमणूक, खेळ, तंत्रज्ञान, वाहने, शिक्षण, राजकारण अशा सर्व विषयांवरील कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर गुगलवर मिळते. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2019 मध्ये गुगलने यंदा सर्वाधिक शोधलेल्या विषयांची यादी जाहीर केली आहे. या दुव्यामध्ये गुगलने वर्ष 2019 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.
गुगलवर 2019 मध्ये सर्वात जास्त सर्च झालेले सेलेब्ज यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल ट्रेंड्स 2019 च्या यादीमध्ये (Google Trends 2019 List) बॉलिवूडची सनसनाटी अभिनेत्री सनी लियोनीकडे (Sunny Leone) पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सर्च इंजिन गूगलने सर्च केलेल्या Top 10 सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला नाही. सनी सोडून जे इतर सेलेब्ज यामध्ये सामील आहेत त्यांमध्ये, अभिनंदन वर्धमान, लता मंगेशकर, युवराज सिंग, आनंद कुमार, विक्की कौशल, ऋषभ पंत, रानू मंडल, तारा सुतारिया, सिद्धार्थ शुक्ला आणि कोएना मित्रा यांचा समावेश आहे.
बी-टाउन सेलिब्रिटींच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सनी लि यो नीला 85 टक्के सर्च केले गेले आहे. रानू मंडलला फक्त 1 टक्के सर्च केले गेले आहे. सलमान खानला 18 टक्के, शाहरुख खानला 8 टक्के, तर अक्षय कुमारला 12 टक्के सर्च केले गेले आहे. ही टक्केवारी पाहता तुम्हाला खरच असे वाटते की सनी लियोनकडे दुर्लक्ष केले गेले आहे? (हेही वाचा: 2019 मध्ये Google वर क्रिकेट विश्वचषक, लोकसभा निवडणुका आणि चंद्रयान 2 ची जादू; जाणून घ्या यंदा गुगलवर सर्च केलेल्या Top 10 गोष्टी)
गूगल वरच्या Top 10 सेलेब्जसोबत, भारतातील 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीमध्ये कबीर सिंग, अॅव्हेंजर्स: एंडगेम, जोकर, कॅप्टन मार्वेल, सुपर 30, मिशन मंगल, गली बॉय, वॉर, हाउसफुल 4 आणि उरी यांचा समावेश आहे. मात्र यावर्षी संपूर्ण भारतात गूगल इंडियावर शोधल्या जाणार्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये फक्त कबीर सिंगचा समावेश आहे.