बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) तिच्या मादक आणि हॉट अदांमुळे नेहमीच चर्चेत असते तसेच सोशल मिडियावरही ती बरीच सक्रीय असते. आपले अनेक सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज ती सोशल मिडियावर शेअर करत असते. मात्र सनी लियोन ही केवळ सेक्सी आणि हॉट अदांमध्येच दिसते असे म्हणणा-यांसाठी सनी स्वत:चा एक गावरान अंदाजातला फोटो शेअर केला आहेय यात ती खूपच क्युट दिसत आहे. हे फोटो सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असून हे फोटो नेमके तिच्या आगामी चित्रपटासाठी आहेत की कोणत्या अन्य गोष्टींसाठी ते अजून स्पष्ट झालेले नाही.
सनीने आता मरून रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. अशी बातमी मिळत आहे की हा लूक तिच्या आगामी चित्रपट 'रंगीला' मध्ये पाहायला मिळेल.
पाहा फोटोज:
सनी चे हॉट आणि सेक्सी फोटोज चाहते जितके पसंत करतात तितकाच तिचा हा गावरान लूक चाहत्यांनी पसंत केला आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोजला लाइक्स दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी सनीने आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपले एक नवीन आणि हटके फोटोशूट शेअर केले होते. या फोटोमध्ये ती चक्क 'जलपरी'च्या (Mermaid) वेशात दिसत होती. यात तिच्या मादक अदा आणि बोल्ड (Bold) अंदाज पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले. सनीने हे फोटो शेअर करतात अगदी काही मिनिटांतच तिला लाखोंच्या वर लाइक्स मिळाले आहेत.