Sukesh Chandrashekhar विरोधात Jacqueline Fernandez ने नोंदवला जबाब; म्हणाली, 'त्याने माझे आयुष्य नरक बनवलं'

सुकेशने आपलं करिअर उद्ध्वस्त केलं आणि भावनांशीही खेळल्याचं तिने म्हटलं आहे.

Jacqueline Fernandez | (Photo Credit - Facebook)

Money Laundering Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्रीच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील (Money Laundering Case) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. या प्रकरणामुळे अभिनेत्रीला सतत कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अभिनेत्रीने ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) च्या विरोधात तिचा जबाब नोंदवले आहे. यादरम्यान अभिनेत्रीने सुकेशबाबत अनेक मोठे खुलासेही केले.

सुकेशने अभिनेत्रीच्या भावनांशी खेळ केला

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलीनने पतियाळा कोर्टात ठग सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात वक्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत सुकेशने आपलं करिअर उद्ध्वस्त केलं आणि भावनांशीही खेळल्याचं तिने म्हटलं आहे. सुकेशचे खरे नावही मला माहीत नव्हते. सुकेश चंद्रशेखर हे सरकारी अधिकारी असल्याबद्दल तिला माहिती होती, असे जॅकलीनने कोर्टात म्हटले आहे. याशिवाय सुकेशने स्वत:ला सन टीव्हीचे मालक असल्याचे सांगितले होते. (हेही वाचा - Jacqueline Fernandez च्या अडचणी वाढल्या; आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ED कडून नाव आरोपींच्या यादीत!)

अभिनेत्रीने तिच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, सुकेशने तिला सांगितले होते की तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि माझ्यासोबत तो दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करू इच्छित होता. सुकेश मला दिवसातून किमान तीन ते चार वेळा फोन आणि व्हिडिओ कॉल करायचा. पण तो जेलमधून बोलत आहे, हे मला माहीत नव्हते. कुठल्यातरी कोपऱ्यातून तो फोन करायचा. त्याच्या मागे सोफा आणि पडदाही दिसत होता.

अभिनेत्रीने दावा केला आहे की, तिचे आणि सुकेशचे फोनवर शेवटचे बोलने 8 ऑगस्ट 2021 रोजी झाले होते. त्या दिवसानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधला नाही. जॅकलीनने पुढे खुलासा केला की, जेव्हा तिला केरळला जायचे होते तेव्हा सुकेशने तिला आपले खाजगी जेट वापरण्यास सांगितले. त्यांनी केरळमध्ये तिच्यासाठी हेलिकॉप्टर राईडही आयोजित केली होती. ती म्हणाली, दोन वेळा जेव्हा मी त्याला चेन्नईमध्ये भेटले तेव्हा मी त्यांच्या खाजगी जेटने प्रवास केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif