SRK Quits Smoking: एकेकाळी 100 सिगारेट्स पिणार्‍या Shah Rukh Khan ने धुम्रपानाची सवय सोडल्याची दिली कबुली (Watch Video)

India Today,सोबत बोलताना त्या ने 2011 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाहरूखला दिवसाला 100 सिगारेट पिण्याची सवय होती.

SRK | X

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) ने 2 नोव्हेंबरला आपला 59 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका खाजगी कार्यक्रमामध्ये त्याने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. शाहरूखने त्याची धुम्रपानाची (Smoking) सवय सोडली असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान फॅन्सशी बोलताना त्याने धुम्रपान सोडल्यानंतर आपल्याला धाप लागणं कमी होईल असं वाटलं होतं पण अजूनही ते जाणवत आहे पण हळूहळू तो त्रासही कमी होईल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.

शाहरूख खानने काही वर्षांपूर्वी जाहीररित्या त्याच्या लाईफस्टाईल बद्दल चर्चा केली होती. यावेळेस त्याने धुम्रपान आणि कॅफिन च्या सवयीबद्दल सांगितलं होतं. India Today,सोबत बोलताना त्या ने 2011 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाहरूखला दिवसाला 100 सिगारेट पिण्याची सवय होती. तो पाणी पित नसे, 30 कप ब्लॅक कॉफी पित होता आणि त्याला सिक्स पॅक्स होते. "मी जितकी कमी काळजी घेतो तितकी जास्त काळजी घेतली जाते." असे तो मजेत बोलून गेला होता. Shah Rukh Khan Turns 59: शाहरूख खान च्या 59 व्या बर्थ डेचे खास फोटो Gauri Khan ने केले शेअर; Suhana Khan ची पहा प्रतिक्रिया .

शाहरूख खान सुजय घोष दिग्दर्शित सिनेमामध्ये दिसणार आहे. हा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असेल. या सिनेमामध्ये त्याची लेक सुहाना खान देखील असणार आहे तर अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.