South Actor Mohanlal Hospitalised: मल्याळम अभिनेता मोहनलाल यांची प्रकृती खालावली, श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल
मोहनलाल यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर कोचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची टीम त्याच्या उपचारात गुंतलेली आहे. त्यांना काही औषधे देण्यात आली आहेत.
South Actor Mohanlal Hospitalised: साऊथचा सुपरस्टार मोहनलाल (South Actor Mohanlal) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मोहनलाल यांची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाने अधिकृत निवेदनही जारी केले आहे. ज्यामध्ये त्याच्या आरोग्यसंदर्भात अपडेट शेअर करण्यात आले आहे.
साउथ सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल -
मोहनलाल यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर कोचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची टीम त्याच्या उपचारात गुंतलेली आहे. त्यांना काही औषधे देण्यात आली आहेत. याशिवाय अभिनेत्याला पुढील पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (हेही वाचा - Kalki 2898 AD OTT Release Date: 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज)
अधिकृत वैद्यकीय निवेदनानुसार, अभिनेत्याला व्हायरल संसर्ग झाला आहे. अभिनेत्याला मायल्जिया (स्नायू दुखण्याची) त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहनलाल यांच्या प्रकृतीविषयी समजल्यानंतर त्यांचे चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. (Rhea Chakraborty Viral Video: रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त)
दरम्यान, मोहनलाल 2019 मध्ये रिलीज झालेल्या लूसिफरच्या सिक्वेलची तयारी करत आहे. हा चित्रपट पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट मार्च 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शक्ती कपूर आणि टोविनो थॉमस यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय मोहनलाल यांचा बॅरोज हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)