राखी बांधून महिलेने केला Sonu Sood चा सन्मान; अभिनेत्याच्या घराबाहेरील Video Viral

चाहत्यांकडून सोनूचं वारंवार कौतुक होत असून अनेकदा भेटीदरम्यान प्रेम, आदर व्यक्त करत आहेत. असाच एक प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.

Woman tied rakhi to Sonu Sood (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता आणि कोविड-19 संकटात गरजूंसाठी देवदूत असणारा सोनू सूद (Sonu Sood) याला देशवासियांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. चाहत्यांकडून सोनूचं वारंवार कौतुक होत असून अनेकदा भेटीदरम्यान प्रेम, आदर व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर सोनूचे सामाजिक कार्य लक्षात घेत त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळते. या लोकांना भेटण्यासाठी सोनू खुद्द बाहेर येऊन त्यांच्याशी गप्पा मारतो. यावेळी काहीजण आपल्या समस्या सांगतात तर काहीजण त्याचे आभार मानतात. अशाच प्रसंगाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, त्याच्या घराबाहेर लोक जमले आहेत. त्यातील एका महिलेने सोनू सूद गेटवर येताच त्याला राखी बांधली. इतक्यावरच ही महिला थांबली नाही तर तिने पाया पडून सोनूचे आशीर्वादही घेतले. (Sonu Sood आता आंध्र प्रदेशात उभारणार Oxygen Plants; म्हणाला, ग्रामीण भारतला पाठिंबा देणार)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

लोकांचे हे प्रेम पाहून सोनू सुद देखील भारावून गेला. अलिकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क डोकं टेकून पाया पडताना पाहायला मिळाले. सोनू सूदच्या मदतीने या व्यक्तीला नोकरी लागली होती. त्यामुळे पाया पडून त्याने आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली.

सोनू सूदच्या अखंड मदतकार्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर अनेक प्रकारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोणी सोनूचे मंदीर बांधून कोणी अभिषेक करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif