सोनू सूदच्या नावाने बनावट कर्जाचे लोकांना आमिष दाखवले जात असल्याप्रकरणी नागरिकांना सावधगिरीचा इशारा
बॉलिवूड मधील अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने त्याच्या नावाने लोकांना बनावट पद्धतीने कर्जाची सुविधा देत असल्याप्रकरणी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
बॉलिवूड मधील अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने त्याच्या नावाने लोकांना बनावट पद्धतीने कर्जाची सुविधा देत असल्याप्रकरणी सावधगिरीचा इशारा दिला आहे. या कर्जासाठी सोनूचे नाव वापरले जात असून त्यासाठी लोकांना प्रोसेसर फी साठी 3500 रुपये मोजावे लागतात. त्याानंतर 60 महिन्यांसाठी 5 लाखांचे कर्ज दिले जाईल असे नागरिकांना सांगितले जाते. फसवणूकदार बनावट एक लेटरहेड सुद्धा तयार करत असून त्यात सोनू सूद फाउंडेशन कडून कर्ज मंजूर झाल्याचे दाखवतात. या लेटरहेटवर फाउंडेशनचा एक बँक खाते क्रमांक सुद्धा दिला जातो. या प्रकरणी सोनू सूद याने उत्तर प्रदेश आणि मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून कॅश डिपॉझिट मान्य केले जाणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले आहे. तर कर्जासाठी EMI हा 7548.49 रुपये प्रति महिना द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या माहितीला बळी पडू नका असे आवाहन केले आहे.(Anurag Kashyap-Taapsee Pannu यांच्या घरावरील आयटी छाप्यानंतर Kangana Ranaut चे ट्विट; केले 'हे' गंभीर आरोप)
Tweet:
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद हा गरजवंतांसाठी देव बनला होता. त्याने हजारोंच्या संख्येने कामगारांना स्वखर्चाने आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. ऐवढेच नाही तर त्यांच्या खाण्यासह काहींना रोजगार सुद्धा उपलब्ध करुन त्याने दिला. मात्र सध्या सोनूच्या नावाने नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.