FIR Against Sonu Nigam: कॉन्सर्टमधील वादग्रस्त विधानामुळे सोनू निगम अडचणी; कन्नड संघटनेने दाखल केली तक्रार

बेंगळुरूमधील ईस्ट पॉइंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम एका चाहत्याच्या वागण्यावर संताप व्यक्त करताना दिसत असून त्याची तुलना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी करत आहे.

Sonu Nigam (फोटो सौजन्य - फेसबुक)

FIR Against Sonu Nigam: कर्नाटकात झालेल्या एका संगीत कार्यक्रमामुळे प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) एका नव्या वादात अडकला आहे. बेंगळुरूमधील ईस्ट पॉइंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम एका चाहत्याच्या वागण्यावर संताप व्यक्त करताना दिसत असून त्याची तुलना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी करत आहे.

सोनू निगमविरोधात पोलिसात तक्रार -

दरम्यान, या वक्तव्याबाबत कर्नाटक रक्षा वेदिके (KRV) नावाच्या संघटनेने सोनू निगमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की सोनू निगमने एका चाहत्याने कन्नड गाण्याच्या विनंतीची तुलना एका गंभीर दहशतवादी घटनेशी केली, ज्यामुळे कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. (हेही वाचा -Swaraswamini Asha Bhosle यांचे गायक सोनू निगम यांनी स्टेजवर धुतले पाय; कारण घ्या जाणून (Watch Video))

काय म्हणाला सोनू निगम?

व्हिडिओमध्ये सोनू निगम म्हणत आहे की, एक लहान मुलगा मला कन्नड गाणे गाण्यासाठी आग्रह करत होता तेव्हा मला वाईट वाटले. पहलगामसारख्या घटनांचे मूळ हे असे वर्तन आहे. बघा, तुमच्या समोर कोण उभा आहे. सोनू निगम यांचे हे विधान सोशल मीडियावर टीकेचे कारण बनले आहे. अनेक वापरकर्त्यांनी याला भाषा आणि प्रादेशिक ओळखीचा अपमान असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा - Attack on Singer Sonu Nigam: गायक सोनू निगम याला मारहाण, मुंबईतील चेंबूर परिसरात आयोजित संगीत कार्यक्रमादरम्यानची घटना (Watch Video))

 

View this post on Instagram

 

A post shared by Namma Bengaluru (@nammabengaluroo)

तथापि, सोनू निगमने स्पष्ट केले की, त्यांना कन्नड भाषा आणि लोकांबद्दल खूप आदर आहे. त्याने यापूर्वी अनेक कन्नड गाणी गायली आहेत, परंतु जबरदस्ती आणि आक्रमकता त्याला अस्वस्थ करते. असे असूनही, केआरव्हीने सोनू निगमचे विधान असंवेदनशील आणि चिथावणीखोर असल्याचे म्हटले असून त्याच्याविरोधात संघटनने कारवाईची मागणी केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement