Sonam Kapoor Ahuja ने सुरू केली 'ब्लाइंड' चित्रपटाची शुटिंग; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

हा चित्रपट सिरियल किलरच्या शोधात असणाऱ्या अंध पोलिस अधिकाऱ्यावर आधारित आहे.

Sonam Kapoor Ahuja (PC- Facebook)

सोनम कपूर आहूजा (Sonam Kapoor Ahuja) लॉकडाउनमध्ये कुटुंबासमवेत बराच वेळ घालवून पुन्हा कामावर परतली आहे. तिने आपला आगामी चित्रपट 'ब्लाइंड' (Blind) ची शूटिंग सुरु केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने आपल्या ट्विटर हँडलवरून 'ब्लाइंड' चित्रपटाचे क्लॅप शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. सोनम कपूरने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे तिच्या क्राइम थ्रिलर असलेल्या ब्लाइंड चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. हा चित्रपट सिरियल किलरच्या शोधात असणाऱ्या अंध पोलिस अधिकाऱ्यावर आधारित आहे.

दरम्यान, ब्लाइंड हा 9 वर्षांपूर्वी रिलीज करण्यात आलेला कोरियन चित्रपट आहे. याचा अधिकृत रिमेक आता बॉलिवूडमध्ये बनवला जात आहे. या चित्रपटात सोनम कपूर एका अंध व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा पोलिस अकादमीतील एका विद्यार्थीनीविषयी आहे, जीच्या जीवनात दृष्टी गमावल्यानंतर एक अपघात होतो. या अपघातामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलते. हिट अँड रन प्रकरणातील ती एकमेव साक्षीदार असून ती पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यात मदत करत आहे. (हेही वाचा - Anil Kapoor Birthday: ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या सेटवर साजरा करण्यात आला अभिनेता अनिल कपूर यांचा वाढदिवस; पहा Inside Video)

या चित्रपटात विनय पाठक, पूरब कोहली यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शोम माखीजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुजॉय घोष यांनी केली आहे. पुढच्या वर्षी 2021 मध्ये ब्लाइंड चित्रपट रिलीज केला जाऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सोनम कपूर आहूजा यापूर्वी जोया फॅक्टर चित्रपटात दिसली होती. आता सोनम बऱ्याच दिवसांनी चित्रपटांमध्ये परतली आहे. सोनम कपूरने सावरिया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने आय हेट लव्ह स्टोरी, रांझणा, दिल्ली -6, नीरजा, प्रेम रतन धन पायो, वीरे दी वेडिंग, अशा चित्रपटांमध्ये काम केलं. सोनमने 8 मे 2018 रोजी आनंद आहूजाशी लग्नगाठ बांधली होती.