कॅन्सर विरोधात लढा देणाऱ्या Rakhi Sawant च्या आजारी आईच्या मदतीसाठी पुढे आला Sohail Khan; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, काही गरज लागल्यास मला कॉल कर

सोहेलअगोदर सलमान खाननेही राखीच्या आईसाठी मदतीचा हात पुढे केला होता.

राखी सावंत आणि तिची आई जया भेदा (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ची आई कर्करोगाविरूद्ध लढा देत आहे. राखीची आई जया भेडा (Jaya Bheda) यांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटीज पुढे आले आहेत. आता राखीच्या आईला मदत करण्यासाठी सोहेल खान (Sohail Khan) ने व्हिडिओ संदेशाद्वारे मदतीचा हात पुढे केला आहे. सोहेलने राखीला आईच्या आजारासंदर्भात कोणतीही मदत लागल्यास मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

सोहेल खानने व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे की, "प्रिय राखी, तुला आणि तुझ्या आईला काही हवे असेल तर मला थेट कॉल कर. मी तुझ्या आईला कधीचं भेटलो नाही पण तुला ओळखतो. तू एक शूर मुलगी आहे. त्यामुळे तुझ्या आईमध्ये किती शक्ती असेल. त्यांची तब्बेत लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. तु तशीच राहाल आणि गोष्टी आपोआप ठिक होतील. तु मला थेट कॉल करू शकते. मी तुला लवकरचं भेटेल आणि जेव्हा तुझ्या आईची तब्बेत बरी होईल, तेव्हा त्यांच्याशी बोलेल. स्वत: ची काळजी घे." (वाचा - Mumbai Saga Trailer: जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी च्या 'मुंबई सागा' अॅक्शन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

सोहेलअगोदर सलमान खाननेही राखीच्या आईसाठी मदतीचा हात पुढे केला होता. जया भेडा यांनीही सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांचे आभार मानताना म्हटलं होतं की, "धन्यवाद, सलमान आणि सोहेल. माझी केमोथेरपी चालू आहे आणि मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे. अजून दोन केमो सेशन्स होणार आहेत. त्यानंतर माझे ऑपरेशन केले जाईल. आपणा सर्वांना आरोग्य लाभो आणि देव तुमची अधिक प्रगती करो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. "

राखी सावंत बिग बॉस 14 मधून 14 लाखांच्या बक्षिसासह बाहेर पडली होती. तसेच रुबीना दिलैकने या शोच्या विजेत्या पदावर आपलं नाव कोरलं होतं.