Salman Khan House Firing Case: 'समाजाला बदलावे लागेल...', सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी लॉरेन्सने दिला होता हा संदेश; हल्लेखोरानी दिली कबुली

अनमोल बिश्नोई यांनीही रेकॉर्ड केलेल्या संदेशाद्वारे दोन्ही हल्लेखोरांना प्रेरित केले होते. ते समाजासाठी काम करत असून यामुळे समाज सुधारण्यास मदत होईल, असे लॉरेन्सने म्हटलं होतं.विक्की गुप्ताने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, तो आणि सागर या कामासाठी इतके उत्साहित होते की ते कोणत्याही व्यक्तीला गोळ्या घालण्यास तयार होते.

Lawrence Bishnoi, Salman Khan (PC - Twitter/Instagram)

Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) करणाऱ्या आरोपीच्या कबुलीजबाबाची खास माहिती आता समोर आली आहे. विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी त्यांच्या कबुलीजबाबात सांगितले की, त्यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) चा भाऊ अनमोलकडून अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. याशिवाय, गोळीबाराच्या आधी सिग्नल ॲपवर संदेशही पोस्ट केला होता. 14 एप्रिलच्या पहाटे वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर विकी आणि सागर यांनी पाच राऊंड गोळीबार केला. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई स्वतः हल्लेखोरांशी बोलला होता. आरोपीचे हे वक्तव्य आता मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने दाखल केलेल्या आरोपपत्राचा भाग आहे. या आरोपपत्रानुसार, या हल्ल्याचे नियोजन सुमारे वर्षभरापूर्वीच अनमोल बिश्नोई या व्यक्तीनेच केले होते.

लॉरेन्स विश्नोईने दिले होते आरोपींना प्रोत्साहन -

14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या काही तासांपूर्वी अनमोल बिश्नोईने मनोबल वाढवण्यासाठी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना त्यांचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी बोलायला लावले होते. यानंतर लॉरेन्स बिश्नोईने दोन हल्लेखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी 'तुमचे काम चांगले होईल, काळजी करू नका आणि गोळीबारासाठी सज्ज व्हा' असा संदेश दिला होता. (हेही वाचा -Gangster Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई कोण आहे? ज्याच्या टोळीने दिवसाढवळ्या केली Sidhu Moose Wala ची हत्या; सलमान खानलाही दिली होती जीवे मारण्याची धमकी)

अनमोल बिश्नोई यांनीही रेकॉर्ड केलेल्या संदेशाद्वारे दोन्ही हल्लेखोरांना प्रेरित केले होते. ते समाजासाठी काम करत असून यामुळे समाज सुधारण्यास मदत होईल, असे लॉरेन्सने म्हटलं होतं.विक्की गुप्ताने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, तो आणि सागर या कामासाठी इतके उत्साहित होते की ते कोणत्याही व्यक्तीला गोळ्या घालण्यास तयार होते. गोळीबार करताना आपल्या मार्गात येणाऱ्या कोणालाही ठार मारण्याची तयारी करत असल्याचे त्याने आपल्या जवाबात म्हटले आहे. (हेही वाचा - Salman Khan House Firing: बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत भाईजानला दिली धमकी)

विकीने सांगितले की, तो आणि सागर एकाच गावातील आहेत. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा त्याला सिगारेट ओढण्याची इच्छा जाणवली तेव्हा तो बाहेर गेला आणि सागरला भेटू लागला. दिवाळी 2022 नंतर तो सागर पाल याच्याशी नियमित बोलू लागला. मग सागरने त्याला सांगितले की, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांना ओळखतोय त्याचा अंकित नावाचा मित्र आहे जो लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करतो. सागर पाल हा जालंधर येथील एका स्पेअर पार्ट्स कंपनीत कामाला होता. 2023 च्या सुरुवातीला सागरने विकीला 500 रुपयांची मदत केली होती. जुलै 2023 मध्ये विक्की गुप्ता ड्रायव्हरच्या नोकरीच्या शोधात सागरला भेटण्यासाठी जालंधरला गेला आणि त्यानंतर तो अंकितला भेटला. यानंतर विकी गुप्ता चेन्नईला गेला आणि नंतर गावी आला. एक महिन्यानंतर सागरने त्याला पुन्हा जालंधर येथे बोलावून घेतले.

दरम्यान, जेव्हा विकी गुप्ता पुन्हा जालंधरला पोहोचला आणि सागरला भेटला तेव्हा त्याने त्याला सांगितले की तो सिग्नलच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईच्या संपर्कात आहे. यानंतर त्याने सलमान खानवर गोळीबार करण्याच्या योजनेचा खुलासा केला. ऑक्टोबर 2023 मध्ये दोघांनाही मुंबईला पाठवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पनवेलमध्ये खोली घेण्याचा सल्ला देण्यात आला. पण काही कारणास्तव तो पुन्हा परत आला. यानंतर मार्च 2024 मध्ये या दोघांना पुन्हा गोळीबार करण्यासाठी पाठवण्यात आले आणि या कामात आणखी काही लोकांनी त्यांना मदत केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now