Rahul Vaidya's Facebook Account Hacked: गायक राहुल वैद्य चे फेसबुक अकाउंट हॅक; हॅकर्सने शेअर केले विचित्र व्हिडिओज
राहुल यांनी आपल्या इंस्टा कथेमध्ये लिहिले आहे, 'हॅलो, माझे फेसबुक पेज हॅक झाले आहे. कृपया हॅकर्सनी पोस्ट केलेल्या कोणत्याही व्हिडिओकडे दुर्लक्ष करा. मी खाते रिकव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहे.'
Rahul Vaidya's Facebook Account Hacked: बिग बॉस 14 चा रनर अप असलेला गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya)सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. चाहत्यांना राहुल यांची पोस्ट्स खूप आवडतात आणि बहुतेकदा त्यांच्याबद्दल तो चर्चेतही असतो. अशातचं आता राहुल पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण काही वेगळं आहे. राहुल वैद्य यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे.
राहुल वैद्य यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर यासंदर्भात माहिती दिली आहे. राहुल यांनी आपल्या इंस्टा कथेमध्ये लिहिले आहे, 'हॅलो, माझे फेसबुक पेज हॅक झाले आहे. कृपया हॅकर्सनी पोस्ट केलेल्या कोणत्याही व्हिडिओकडे दुर्लक्ष करा. मी खाते रिकव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहे.'
इंस्टा स्टोरीशिवाय राहुलने ट्विटरवरही यासंदर्भात माहिती दिली आहे. राहुल वैद्य यांच्या फेसबुकवरून गेल्या 7 तासापासून काही विचित्र व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यातील काही व्हिडिओ मजेशीर आहेत तर काही व्हिडिओ प्रॅन्क आहेत. (वाचा - Bigg Boss 14 फेम Nikki Tamboli चा भाऊ Jatin Tamboli चे COVID-19 मुळे निधन; अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट)
राहुल वैद्य सध्या 'खतरों के खिलाड़ी 11' शो मुळे चर्चेत आहे. बिग बॉस 14 मधील प्रत्येकाची मने जिंकल्यानंतर आता राहुलचे चाहते लवकरचं त्याला खतरों के खिलाडीच्या 11 व्या सीझनमध्ये पाहू शकणार आहेत. अलीकडेचं राहुलने शोबद्दल बोलताना सांगितले की, त्याला साप आणि पाण्याची भीती वाटते.
दरम्यान, राहुल वैद्यला काही दिवसांपूर्वी त्याची मैत्रीण दिशा परमार कडून एक खास गिफ्ट मिळालं होतं. दिशाने राहुलला घड्याळ गिफ्ट केले होतं. ज्याची किंमत अंदाजे 71 हजार रुपये आहे. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो चाहत्यांना खूपचं आवडला होता.