Sidhu Moosewala’s Mother Pregnant: दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्या आई गर्भवती; वडीलांच्या 'आनंदाला पारावार नाही'
लवकरच त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे.
दिवंगत पंजाबी गायक शुभदीप सिंह सिद्धू (Shubhdeep Singh Sidhu) उर्फ सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांचे आई-बाबा पुन्हा एकदा नव्याने पालकत्वाची तयारी करत आहेत. लवकरच त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मूसेवाला यांच्या आई चरण कौर गर्भवती (Charan Kaur Pregnant) आहेत. त्यामुळे या कुटंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. पंजाबी संगीत क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलेले आणि आपल्या गाण्यांनी तरुणांची मने जिंकणारे सिद्धू मूसेवाला यांच्यावर 29 मे 2022 रोजी गोळीबार झाला. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबामध्ये दु:ख आणि वेदनेचेच वातावरण होते. मात्र, नव्या बाळाची चाहूल लागल्याने कुटुंबात आनंद पसरल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
सिद्धू मूसेवाला: गायक, गीतकार आणि संगीतकार
पंजाबी संगीतातील योगदानासाठी ओळखले जाणारे सिद्धू मूसवाला हे केवळ गायकच नव्हते तर त्यांची गीतकार आणि संगीतकारही होते. त्यांनी काही अल्बम्सची निर्मितीसुद्धा केली होती. त्यांच्या अकाली निधनानंतरही त्यांची काही गाणी आणि अल्बम प्रदर्शीत करण्यात आले. ज्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मृत्यूपूर्वी काही काळ त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. सन 2022 मध्ये मानसा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. पंजाब विधानसभेत जाण्याचे त्यांचे स्वप्न अधूरेच राहिले. (हेही वाचा, Sidhu Moosewala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोई भारतीय पोलिसांच्या ताब्यात, अझरबैझान येथून प्रत्यार्पण)
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून मूसेवाला यांची हत्या
सिद्धू मूसेवाला हे त्यांच्या आई-बाबांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा मोठा धक्का त्यांना बसला होता. मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली होती. मूसवाला यांचे वडील बलकौर सिंग आपल्या मुलाच्या हत्येबद्दल न्याय मिळविण्यासाठी आवाज उठवत आहेत. याशिवाय ते जकारणात येण्याच्या विचारात आहेत, तर त्यांच्या आईने आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 'दिल्ली चलो' आंदोलनात अलिकडेच सक्रिय सहभाग घेतला होता. मूसेवाला यांच्या हत्या प्रकरण देशभर गाजले. काँग्रेस पक्षानेही याबाबत जोरदार आवाज उठवला होता. स्वत: राहुल गांधी यांनी मूसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. (हेही वाचा, Attacked On Punjabi Singer: Sidhu Moose Wala नंतर आता आणखी एका पंजाबी गायकावर हल्ला; सिंगरचा फोटो शेअर करत Honey Singh म्हणाला, 'मी त्यांना सोडणार नाही')
सिद्धू मूसवाला यांचे लोकप्रीय अल्बम आणि गाणी
दरम्यान, सिद्धू मूसवाला यांनी सुरुवातीला संगीत उद्योगात गीतकार म्हणून ठसा उमटवला. निन्जाचे 'लायसन्स' हे गाणे लिहून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2017 मध्ये, त्यांनी गुरलेझ अख्तर सोबत 'जी वॅगन' या युगल गाण्याने विशेष ओळख मिळवली. त्यांच्या प्रदर्शनात 'द लास्ट राइड', '295,' 'सो हाय,' 'फेमस,' 'सम बीफ,' 'टोचन,' 'इसा जट्ट,' 'बंबीहा बोले,' यासारख्या हिट ट्रॅकचा समावेश आहे.