Sushant Singh Rajput Funeral: सुशांत सिंह राजपूत अखेरचा निरोप द्यायला कुटूंबा समवेत श्रद्धा कपूर, क्रिती सेनॉनसह अनेक बॉलिवूडकर स्मशानभूमीत दाखल

या स्मशानभूमीत सुशांतच्या कुटूंबासह अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सेनॉन, दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासह अनेक कलाकार दाखल झाले आहेत.

Sushant Singh Rajput Funeral (Photo Credits: Yogen Shah)

14 जून हा दिवस बॉलिवूडसाठी (Bollywood) काळा दिवस ठरला. सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी गळफास लावून सुशांतने आत्महत्या केली. पोलिसांनी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले होते. आज त्याचा मृतदेह विर्लेपार्ल्यातील स्मशानभूमीत आणण्यात येणार असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या स्मशानभूमीत सुशांतच्या कुटूंबासह अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सेनॉन, दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासह अनेक कलाकार दाखल झाले आहेत.

बालाजी टेलिफिल्म च्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून 'मानव' या नावाने घराघरात पोहोचलेला सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येने सर्वांना धक्काच बसला. हा धक्का त्याच्या कुटूंबाला पचविणे जितके अवघड आहे तितकच त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांना.

 

View this post on Instagram

 

#shradhhakapoor at last rites of #sushantsinghrajput #yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

सुशांतसिंग राजपूत याची ओळख 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेपासून झाली. त्यानंतर तो ' काय पो छे', 'पीके', 'महेंद्रसिंग धोनी - अनटोल्ड स्टोरी' अशा दर्जेदार सिनेमांमध्ये झळकला होता. छिछोरे या त्याच्या शेवटच्या सिनेमामध्ये त्याने आत्महत्याग्रस्त मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर ' दिल बेचारा' या सिनेमामध्ये सुशांत शेवटचा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

#mukeshchhabra #kritisanon at last rites of#sushantsinghrajput #yogenshah #yogenshah Please note my images and videos cannot be posted on any platforms without my written consent.

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

सुशांतसिंग राजपूत सारख्या कलाकाराच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, करिना कपूर, करण जोहर यांच्यापासुन अगदी किरण मोरे, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now