Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना आज न्यायालयात हजर करणार
शुक्रवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकली. यावेळी एनसीबीनं रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. शुक्रवारी रात्री एनसीबीकडून शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक करण्यात आली. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Sushant Singh Rajput Case: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. शुक्रवारी एनसीबीने शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांच्या घरी धाड टाकली. यावेळी एनसीबीनं रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. शुक्रवारी रात्री एनसीबीकडून शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक करण्यात आली. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एनसीबीचे अधिकारी त्यांच्या मुंबई कार्यालयातून शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा, आणि जैद आणि कैझेन इब्राहिम यांच्यासमवेत रवाना झाले आहेत. न्यायालयात हजर करण्यापूर्वी या चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी या सर्वांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (हेही वाचा -'माझी कर्मभूमी मुंबईवरील प्रेम सिद्ध करण्याची मला गरज नाही, मुंबई मला यशोदेसारखी, जिने मला दत्तक घेतले आहे'- कंगना रनौत)
दरम्यान, शुक्रवारी सकाळी एनसीबीची दोन पथकं शौविकच्या घरी तपासासाठी गेली होती. तसेच सॅम्युअलच्या घरी NDPS अॅक्ट अंतर्गत झडती घेण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आलं होतं.