पद्मावत अभिनेत्री Anupriya Goenka चा धक्कादायक खुलासा; म्हणाली, मी 18 वर्षांची असताना एका धर्म गुरु ने माझ्यासोबत केलं होत 'हे' कृत्य

'पद्मावत' तसेच 'टाइगर जिंदा है' या चित्रपटात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोयंका (Anupriya Goenka) ने आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे.

अनुप्रिया गोयंका (Photo Credits: Instagram)

'पद्मावत' तसेच 'टाइगर जिंदा है' या चित्रपटात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोयंका (Anupriya Goenka) ने आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे. अनुप्रियाने सांगितलं आहे की, ती 18 वर्षांची असताना एका धर्म गुरुने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे तिला मोठा धक्का बसला होता. अनुप्रिया नुकतीच 'आश्रम' (Aashram) या वेब सीरिजमध्ये दिसली होती. अनुप्रियाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'तिचे वडील खूप धार्मिक व्यक्ती आहेत आणि ते सहसा मदतीसाठी बाबा किंवा साधूंचा शोध घेत असतं. आपल्या आस्थेमुळे ते बाबांवर पूर्ण विश्वास ठेवत असतं. यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले.'

यासंदर्भात पुढे बोलताना अनुप्रिया म्हणाली की, "आमचे कुटुंब बाबांचा सल्ला घ्यायचे आणि त्यांच्यावर खूप विश्वास ठेवत असे. मीही हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण, ते बाबा नेहमी योग्य गोष्टी बोलत असतं. पण एक दिवस त्याने माझा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते. त्या घटनेने मला खूप अस्वस्थ केले होते. मी कशीतरी त्या परिस्थितीतून बाहेर पडले. मला त्या बाबांवर आधीचं शंका आली होती, तरीही मी त्यांच्यावर विश्वास का ठेवला असा प्रश्न मला पडला."(हेही वाचा -Suraj Pe Mangal Bhari चित्रपटातील 'लड़की ड्रामेबाज है' गाण्यात दिसला फातिमा सना शेख चा हॉट अंदाज; दिलजीत दोसांझचीही दिसली झलक (See Video))

 

View this post on Instagram

 

For @tmm_india Outfit @mehraab_off Interview @kartikyaofficial Photoshoot @pauldavidmartinphotography Styled by @yeanshalodha Shoes @onlytwofeet_ HMU @sahil_anand_arora Designers: Arun Ahuja, John Marya, Aarti Talwar and Anu Seth (MEHRAAB) #instadaily #fashion #fashionphotography #style #stylestatement #pauldavidmartin #pauldavidmartinphotography #womenswear #womensfashion #bollywood #stylediaries #styleoftheday #stylestatement

A post shared by Anupria Goenka (@goenkaanupriya) on

अनुप्रियाने सांगितलं की, आस्था आणि श्रद्धा या बाबतीत आपण बर्‍याचदा चुकीच्या मार्गाने जातो आणि याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो. आजही त्यांचे वडील या बाबींमध्ये कमकुवत आहेत. परंतु, आता ते सावध असतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now