शिल्पा शेट्टी चा मुलगा वियान आणि 9 महिन्यांची मुलगी समिषा यांनी अशी साजरी केली पहिली भाऊबीज (Watch Video)
भाऊबीज हा बहिण-भाव्याच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण. भारतासह परदेशातही भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या सणाचा आनंद, उत्साह घराघरात पाहायला मिळतो. सामान्यांपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वच हा सण साजरा करतात.
Bhai Dooj 2020: भाऊबीज हा बहिण-भाव्याच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण. भारतासह परदेशातही भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या सणाचा आनंद, उत्साह घराघरात पाहायला मिळतो. सामान्यांपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वच हा सण साजरा करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) च्या घरी देखील भाऊबीजेचा सण साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा (Viaan Raj Kundra) आणि 9 महिन्यांची मुलगी समिषा शेट्टी (Samisha Shetty) यांनी भाऊबीज साजरी केली.
शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "माझ्या हृदयाचे दोन तुकडे. वियान आणि समिषा त्यांची पहिली भाऊबीज साजरी करताना. माझे हृदय कृतज्ञतेने भरलेले आहे. कारण माझ्या मुलाचे बहिण हवी असण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याच्या हास्यातून त्याचा आनंद अगदी स्पष्टपणे झळकतो. थॅक्स यू युनिव्हर्स."
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राला देखील टॅग केले आहे. या व्हिडिओत छोटी समिषा आई शिल्पा शेट्टीच्या मांडीत बसली आहे आणि भावाला ओवाळत आहे. या क्युट व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Happy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो)
शिल्पा आपल्या मुलीच्या जन्माबद्दल अनेकदा देवाचे आभार मानत असते. तिच्या पोस्टमधून तिची कृतज्ञता अनेकदा प्रतित होत असते. नवरात्री देखील तिने मुलीचे कन्यापूजन केले होते. दरम्यान, मुलीच्या जन्मासाठी तिला खूप काळ प्रतिक्षा करावी लागली असल्याचे तिने यापूर्वी स्पष्ट केले होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2020 01:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

