IPL Auction 2025 Live

कोटींच्या फसवणुकीप्रकरणी Shilpa Shettyचे स्पष्टीकरण, माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न

अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, मला याचा धक्का बसला आहे. या गोष्टींमुळे माझी प्रतिष्ठा खराब होत आहे.

Shilpa Shetty (Photo Credit - Instagram)

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा त्रास कमी होताना दिसत नाहीये. आज शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या विरोधात मुंबईच्या (Mumbai) वांद्रे पोलिसांनी दीड कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आता याप्रकरणी शिल्पा शेट्टीचे वक्तव्य समोर आले आहे. शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. शिल्पाने लिहिले की, सकाळी उठताच मला कळले की माझ्या आणि राजविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याचा मला खूप धक्का बसला आहे. मला सांगायचे आहे की SFL हा एक फिटनेस उपक्रम आहे जो काशिफ खान चालवतो. या ब्रँडच्या नावाने त्यांनी देशभरात फिटनेस जिम उघडण्याचे अधिकार घेतले होते. तो सर्व करारांवर स्वाक्षरी करायचा, बँकेच्या सर्व तपशीलांची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यांच्या कोणत्याही व्यवहाराबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही आणि आम्ही कोणतेही पैसे घेतलेले नाहीत.”

शिल्पाने पुढे लिहिले की, काशिफ फ्रँचायझीशी संबंधित सर्व डील करत असे. ही कंपनी 2014 मध्ये बंद झाली होती आणि तिचे संपूर्ण ऑपरेशन काशिफ खान करत होते. मी गेल्या 28 वर्षांपासून कठोर परिश्रम करत आहे आणि मला खूप वाईट वाटते की माझे नाव कोणत्याही परिस्थितीत यात सहजपणे ओढले जात आहे, यामुळे माझी प्रतिष्ठा खराब होत आहे. मी कायद्याचे पालन करणारी आणि देशाचा मान ठेवणारी नागरिक आहे आणि माझ्या हक्कांचा आदर केला पाहिजे. (हे ही वाचा अभिनेत्री Shilpa Shetty आणि पती Raj Kundra यांनी Sherlyn Chopra विरोधात दाखल केला 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा.)

काय आहे प्रकरण ?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन बराई नावाच्या तक्रारदाराने वांद्रे पोलिसांना माहिती देत असे म्हटले की, जुलै 2014 पासून ते आतापर्यंत एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे डायरेक्टर शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शाह आणि त्यांच्या साथीदाराने बराई याची फसवणूक केली आहे. बराई याने पोलिसांना सांगितले की, जर त्याने त्यांच्या कंपनीची फ्रेंचाइजी घेण्यासह पुण्यातील कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केल्यास मोठा फायदा होईल. बराई याला यासाठी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी लावले. मात्र त्यानंतर बराई याचे पैसे हे आरोपींनी आपल्या फायद्यासाठी वापरले. परंतु जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा बराई याला धमकावले गेले.

तक्रार दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासह अन्य आरोपींच्या विरोधात IPC कलम 406.409,420,506,34 आणि 120(B) अंतर्गत गु्न्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.