कर्जतचा वडापाव खाण्याचा Shilpa Shetty ला देखील आवरला नाही मोह, केले असे काही पाहून तुम्हालाही येईल हसू, Watch Video

शिल्पाने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ती कर्जतमार्गे जात असता कर्जतचा वडापाव खाण्यासाठी तिने खास गाडी थांबवली आणि गाडीत बसून गरमागरम वडापाव आणि भजी खाताना दिसली.

Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

खूपच फिटनेस फ्रिक असलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कधी काय करेल याचा काही नेम नाही. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली शिल्पा आपले एकाहून एक सरस पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कधी आपले योगा, जिमचे फोटो, व्हिडिओ, कधी रेसिपीचे, कधी मजेशीर व्हिडिओ टाकून चाहत्यांना खूश करत असते. मात्र नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती एखाद्या खादाडाप्रमाणे वडापाव वर ताव मारताना दिसत आहे. मुंबईत प्रसिद्ध वडापाव पैकी एक असलेला कर्जतचा वडापाव (Karjat Vada Pav) खाण्याचा मोह तिला आवरला नाही आणि त्यासाठी तिने खास गाडी थांबवून मनसोक्त वडापाव आणि भज्यांवर ताव मारताना दिसली.

शिल्पाने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ती कर्जतमार्गे जात असता कर्जतचा वडापाव खाण्यासाठी तिने खास गाडी थांबवली आणि गाडीत बसून गरमागरम वडापाव आणि भजी खाताना दिसली. हेदेखील वाचा- Shilpa Shetty Ganpati Viral Video: गणपती विसर्जनानंतर शिल्पा शेट्टी हिचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पहा काय आहे खास

 

View this post on Instagram

 

Chalte Chalte dekha Vada pao Mann ne bola Sunday hai Toh Khao Khao Khao Banta hai bhau!😛😂🤪🤣 Travelling back from Karjat and this is my favourite Binge food cause its made the best here.. 😊Excuse the food in my mouth..😝 #sundaybinge time.. Crispy Spicy #vadapav ( #onionbhajias #samosas and #palakpakoda 🤦🏽‍♀️🤪) #travelfood #sundayfunday #sundayvibes #guiltfree #streetfood #gratitude #happy

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

शिल्पा जेवढी फिटनेस फ्रिक आहे तेवढीच ती चांगली खवय्येही आहे. विशेषत: तिला फास्ट फूड पानीपुरी, वडापाव यांसारखे पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे कर्जतचा वडापाव खाणारी शिल्पा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. गाडीत बसून भजी आणि वडापावचा छान आस्वाद घेताना ती या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now