Diljit Dosanjh सोबत 'Honsla Rakh' चित्रपटात दिसणार Shehnaaz Gill; पहा चित्रपटाचे खास Poster

जो येत्या 15 ऑक्टोबर 2021 रोजी दसराच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.

Honsla Rakh Film Poster (Photo Credits: Instagram)

पंजाबी सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणारे दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) आता निर्माता म्हणून पदार्पण करणार आहेत. आज त्यांनी आपला 'हौंसला रख' (Honsla Rakh)हा नवीन सिनेमा जाहीर केला आहे. जो येत्या 15 ऑक्टोबर 2021 रोजी दसराच्या निमित्ताने प्रदर्शित होईल. या चित्रपटात दिलजितसोबत बिग बॉस 13 फेम शहनाज गिलसुद्धा (Shehnaaz Gill) दिसणार आहेत. यासह या चित्रपटात सोनम बाजवा आणि शिंदा ग्रेवालदेखील यात दिसणार आहेत.

आज दिलजितने चित्रपटाची घोषणा करत सिनेमाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना दिलजितने लिहिलं आहे की, "या दसऱ्याला 'हौंसला रख' 15 ऑक्टोबर 2021." दिलजितच्या या पोस्टवर भाष्य करताना अभिनेत्री झरीन खानने म्हटलं आहे की, "मी याची आतुरतेने वाट पाहत आहे." (वाचा - Prithviraj Film Release on Diwali: अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' चित्रपट दिवाळीच्या दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज; 'या' चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही झाली कन्फर्म)

दिलजीतसमवेत शहनाजच्या या चित्रपटाची बातमी ऐकताच त्याचे चाहतेही खूप आनंदित झाले आहेत. शहनाज बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या दरम्यान आता एक पंजाबी चित्रपटात तिला कास्ट केल्याची बातमी आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

चित्रपटाची घोषणा केल्यानंतर, त्याच्या पोस्टर्सवर भाष्य करताना शहनाज आणि दिलजीतचे चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, या चित्रपटासाठी तिकीट आधीपासूनच आरक्षित केले जाईल. आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतरचं तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif