Mannat Bungalow Inspected by BMC (फोटो सौजन्य - X/@gocreditdharma)

Mannat Bungalow Inspected by BMC: बॉलीवूड स्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) च्या 'मन्नत' (Mannat Bungalow) या घराचे नूतनीकरण सुरू आहे. अशातच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) शाहरुख खानच्या घरातील दुरुस्तीचे काम नियमांकडे दुर्लक्ष करून केले जात असल्याची तक्रार मिळाली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर, बीएमसीने शाहरुख खानच्या घर 'मन्नत'ला भेट दिली. शुक्रवारी बीएमसीचे एक पथक शाहरुख खानच्या घर 'मन्नत'ला पोहोचले.

बीएमसी अधिकाऱ्यांनी केली शाहरुख खानच्या घराची पाहणी -

तक्रारीनंतर वन विभाग आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या पथकाने शाहरुख खानच्या बंगल्याची पाहणी केली. दोन्ही विभागांना किनारपट्टीच्या नियमांचे उल्लंघन करून नूतनीकरणाचे काम केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. टाईम्स ऑफ इंडियाने वन विभागाच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, 'एका पथकाने जागेची पाहणी केली. आम्हाला याबद्दल तक्रार मिळाली होती. तपासणीनंतर, लवकरच अहवाल तयार करून सादर केला जाईल.' (हेही वाचा - Akshar Kothari Wedding: बचपन का प्यार! अभिनेता अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, शेअर केले लग्नाचे खास क्षण!)

दरम्यान, अधिकाऱ्याने सांगितले की, 'वन विभागाच्या विनंतीच्या आधारे, आमचे अधिकारी पथकासोबत गेले. याशिवाय, आमची इतर कोणतीही भूमिका नव्हती.' तथापि, याबद्दल शाहरुख खानच्या व्यवस्थापकाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले की, 'कोणतीही तक्रार नाही. सर्व काम मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू आहे.' (हेही वाचा - Kabir Khan backs Deepika Padukone: "आमिर-अक्षय देखील 8 तास काम करतात", वांगा-दीपिका वादात कबीर खानची दिपीकाला साथ)

शाहरुख खानच्या मन्नतच्या घराचे नूतनीकरण सुरू आहे. शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह वांद्रे येथील पाली हिल येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. असे म्हटले जाते की मन्नतमधील नूतनीकरणाचे काम सुमारे दोन वर्षे चालेल.