
Kabir Khan backs Deepika Padukone: दीपिका पदुकोणने संदीप रेड्डी वांगाचा(Sandeep Reddy Vanga) चित्रपट 'स्पिरिट' सोडण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे 8 तासांच्या शिफ्टची मागणी आहे. यानंतर, 8 तासांच्या कामाबद्दल इंडस्ट्रीमध्ये एक नवीन वाद सुरू झाला. दीपिका पदुकोण (Deepika Padukone)च्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. आता दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांनीही दीपिका पदुकोणचे समर्थन केले आहे. त्यांनी आमिर खान आणि अक्षय कुमारसह अनेक कलाकारांची उदाहरणे देऊन 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याच्या दिपीकाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे.
'मला वाटत नाही की दीपिकाला नकार द्यावा'
मुव्हिफाइडशी अलिकडेच दिलेल्या इंटर्व्ह्यूमधये, कबीर खानने इंडस्ट्रीमध्ये कामाच्या तासांबद्दल सुरू असलेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मी 500 क्रू मेंबर्ससोबत काम करतो. ज्यांच्या प्रत्येकाचे स्वतःचे कुटुंब आणि स्वतःचे आयुष्य आहे. त्यांना केवळ पैशांची नाही तर त्यांना मानसिक आरोग्याची देखील गरज आहे.' दीपिकाच्या 8 तासांच्या कामाच्या मागणीला पाठिंबा देत दिग्दर्शक कबीर खानने म्हणाला की हा एक महत्त्वाचा विषय आहे. आमिर खान आणि अक्षय कुमार देखील 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. म्हणून मला वाटत नाही की दीपिकाला असे करण्यास मनाई करावी. जर एखादा चित्रपट निर्माता सहमत नसेल तर त्याने काही तार्किक मुद्दा मांडला पाहिजे.'
मी स्वतः कधीही ओव्हरटाईम केलेला नाही
कबीर खाननेही चित्रपट निर्मिती वैयक्तिक जीवन आणि त्यागाच्या किंमतीवर येते ही धारणा नाकारली. कामाची एक रचना असावी असे तो म्हणाला. कबीरने स्वतः कधीही 12 तासांपेक्षा जास्त शूटिंग केले नाही, कधीही ओव्हरटाईम केला नाही आणि रविवारी कधीही काम केले नाही असे म्हटले.
दीपिका प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास सक्षम
स्पिरिट चित्रपटातून दीपिकाच्या बाहेर पडण्याचे एक कारण म्हणजे तिने मोठी फी मागितली आहे. वृत्तानुसार, दीपिकाने 25 कोटी रुपये फी मागितली होती. दीपिकाच्या अशा फी मागण्याच्या प्रश्नावर कबीर खान म्हणतात की फी प्रेक्षकांच्या अपील आणि बॉक्स ऑफिसच्या मागणीनुसार असावी. दीपिकाचे चाहते चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी करतात. जो कोणी प्रेक्षकांना घेऊन येतो, मग तो अभिनेता असो, दिग्दर्शक असो, पुरूष असो किंवा महिला असो, त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मानधन मिळण्याचा अधिकार आहे.
दीपिका अल्लू अर्जुन आणि अॅटलीसोबत चित्रपटात दिसणार
'स्पिरिट'मधून बाहेर पडल्यानंतर, दीपिका पदुकोण आता अल्लू अर्जुन आणि अॅटली यांच्या आगामी चित्रपट AA22 X A6 मध्ये सामील झाली आहे. अलीकडेच चित्रपटात सामील होण्याची घोषणा करणारा एक व्हिडिओ टीझर प्रदर्शित करण्यात आला. दीपिका चित्रपटात एका योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे.