चंदिगडमधील जर्सीच्या सेटवर शाहिद कपूर जखमी

“एका शॉट दरम्यान, बॉल खूप वेगवान आला आणि त्याच्या खालच्या ओठात जोरात आदळला.

Shahid Kapoor (Photo Credits- Instagram)

Shahid Kapoor Gets Injured: शाहिद कपूरचा पुढील चित्रपट, 2019 मधील हिट तेलगू सिनेमा जर्सीचा हिंदी रिमेकच्या शूटची सुरुवात चंदिगडमध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झाली. आणि चित्रपटाच्या पहिल्या सत्राचे शूट नवीन वर्ष उजाडायचा आधीच पूर्ण देखील झाले.

चित्रपटाची संपूर्ण टीम गुरुवारी, दुसर्‍या शेड्यूलसाठी पुन्हा चंदिगडमध्ये पोहोचली होती परंतु यावेळी 40 दिवसांसाठी. मात्र, दुसऱ्याच दिवशी हे शूट थांबवावे लागले कारण रणजी क्रिकेटपटू म्हणून काम करणाऱ्या शाहिदला क्रिकेटच्या मैदानावरील काही भागाच्या शूटिंगच्या वेळी लेदरच्या बॉलने चेहऱ्यावर  जोरदार मार लागला

चित्रपटाच्या सेटवर असलेल्या सूत्रांनी मुंबई मिररशी बोलताना माहिती दिली आहे की, अभिनेत्याला पुढील चार-पाच दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. “एका शॉट दरम्यान, बॉल खूप वेगवान आला आणि त्याच्या खालच्या ओठात जोरात आदळला. सध्या हनुवटीला सूज आहे व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. एका डॉक्टरला तातडीने त्या ठिकाणी नेण्यात आले आणि जखमेवर इलाज  करण्यासाठी शाहिदला टाके पडले,” सूत्रांनी सांगितले आहे. पाच दिवसांनंतर जखमी कितपत बरी होत आहे हे तपासल्यानंतरच पुढील शूटचे शेड्युल निश्चित केले जाईल.”

'तान्हाजी' व 'छपाक' चित्रपट करण्यासाठी मी सरकारमध्ये भूमिका घेणार: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

शाहिद अजूनही चंदीगडमध्येच होता आणि आज किंवा उद्या मुंबईला परतू शकतो. पहिल्या शेड्यूलमध्ये मुख्यतः इनडोअर आणि संभाषणात्मक दृश्यांनंतर, दुसऱ्या भागात मात्र क्रिकेटचे शूट जास्त आहे. या चित्रपटात शाहिदसोबत प्रमुख भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने डिसेंबरमध्ये त्याच्याबरोबर शूट केले. आणि आता पुढच्या महिन्यात ती दुसर्‍या सत्राचे शूट करणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif