Shah Rukh in Yash Chopra Biopic: प्रसिद्ध निर्माते यश चोप्रा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये झळकणार शाहरुख खान? आदित्य चोप्रा करत आहेत चित्रपटाची प्लानिंग

Shah Rukh in Yash Chopra Biopic: मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी 'यशराज फिल्म्स'ने नुकतीच 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी, सध्या यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी आपल्या कलात्मक टीमसह अनेक मनोरंजक प्रकल्पांवर काम सुरू केले आहे. दरम्यान, आता आदित्य चोप्रा यांनी वडील यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

यश चोप्रा, शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा (Photo Credits: Instagram)

Shah Rukh in Yash Chopra Biopic: मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी 'यशराज फिल्म्स'ने नुकतीच 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी, सध्या यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी आपल्या कलात्मक टीमसह अनेक मनोरंजक प्रकल्पांवर काम सुरू केले आहे. दरम्यान, आता आदित्य चोप्रा यांनी वडील यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

बॉलिवूड हंगामावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटासाठी शाहरुख खानला (Shah Rukh Khan) पहिल्या पर्यायावर ठेवले आहे. यश चोप्रा यांचे जीवन आणि त्यांचा चित्रपट प्रवास बर्‍याच लोकांचे प्रेरणास्थान ठरू शकतो. त्यामुळे आदित्य या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या कास्टिंगला सुरुवात झालेली नाही. मात्र, या चित्रपटात शाहरुखविषयी अशी अटकळ बांधली जात आहे. (हेही वाचा - Mirzapur 2 Promo: कोणाची होणार 'मिर्झापूर'ची गादी? पहा Pankaj Tripathi आणि Divyendu Sharma यांचा तगड्या संवादाने सजलेला 'मिर्झापूर 2' चा नवा प्रोमो (Watch Video))

 

View this post on Instagram

 

5 decades of capturing your hearts...and we have only just begun. Reserve your seats as we promise to entertain you for the next 50. #YRF50

A post shared by Yash Raj Films (@yrf) on

यशराज फिल्म्सने आतापर्यंत चित्रपटसृष्टीला रणवीर सिंग, परिणीती चोप्रा आदी प्रतिभावान कलाकार दिले आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची चौकशी केली होती. यात आदित्य चोप्रा यांचादेखील समावेश होता. त्यावेळी आदित्य चोप्रा यांना यशराज फिल्म्सने सुशांतबरोबर केलेले कॉन्ट्रॅक्ट आणि सुशांतला देण्यात आलेल्या चित्रपटांच्या ऑफर्सबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now