Shah Rukh Khan Left For Switzerland: शाहरुख खान स्वित्झर्लंडला रवाना; लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळणार विशेष पुरस्कार

किंग खान लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल (Locarno Film Festival) मध्ये सहभागी होणार आहे. या सोहळ्यात शाहरुख खानला करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड - पारडो अल्ला कॅरिएराने सन्मानित केले जाईल.

Shah Rukh Khan Left For Switzerland (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Shah Rukh Khan Left For Switzerland: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्वित्झर्लंड (Switzerland) ला रवाना झाला आहे. किंग खान (King Khan) आज 9 ऑगस्टला पहाटे मुंबई विमानतळावर दिसला. किंग खान लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल (Locarno Film Festival) मध्ये सहभागी होणार आहे. या सोहळ्यात शाहरुख खानला करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड (Career Achievement Award) - पारडो अल्ला कॅरिएराने सन्मानित केले जाईल. अभिनेत्याचे मुंबई विमानतळावरील अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.

पांढरा टी-शर्ट आणि केशरी जॅकेट घातलेला किंग खान थेट विमानतळाच्या सुरक्षा स्थळी पोहोचतो. तो तेथे उपस्थित असलेल्या पापाराझींना टाळताना दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांची व्यवस्थापक पूजा ददलानीही दिसली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी, 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पियाझा ग्रांडेमध्ये पुरस्कार सोहळा होणार आहे. येथे शाहरुख खानला करिअर अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाईल. याशिवाय त्यांचा देवदास (2002) हा चित्रपट चित्रपट महोत्सवादरम्यान प्रदर्शित होणार आहे. यानंतर, रविवार, 11 ऑगस्ट रोजी शाहरुख स्पॅजिओ सिनेमाच्या मंचावर त्याच्या चाहत्यांशी भेट आणि संवाद साधणार आहे. (हेही वाचा - Burj Khalifa Lights Up In KKR Colors: केकेआर चॅम्पियन झाल्यानंतर बुर्ज खलिफा चमकला, शाहरुख खानचे 'या' खास पद्धतीने केले अभिनंदन; पाहा व्हिडिओ)

77 वा लोकार्नो चित्रपट महोत्सव 7 ऑगस्टपासून सुरू झाला असून तो 17 ऑगस्ट 2024 रोजी संपेल. नुकताच शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये, किंग खान न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ त्याच रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, शाहरुख खान त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत आहे, ज्याचे नाव आहे 'किंग' असं आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील असणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now