Shah Rukh Khan Dunki Movie: शाहरुख खानच्या 'डंकी'ने रिलीजआधीच केली 100 कोटींची कमाई
300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात या सिनेमाने 640 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1160 कोटींचा गल्ला जमवला आहे.
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'डंकी' या सिनेमाचं बजेट 120 कोटी रुपये आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan), राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani), तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 75 दिवसांत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. 2023 मधला शाहरुखचा हा तिसरा सिनेमा आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. शाहरुख खान पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करत आहे. (हेही वाचा - ‘12th Fail’ submitted For Oscars: ‘12th फेल’ ऑस्करसाठी पाठवला, अभिनेता विक्रांत मॅस्सीची माहिती)
'डंकी' या सिनेमाचे नॉन थिएट्रिकल राईट्स 'जवान'च्या किंमतीत विकले गेले आहेत. 'डंकी' या सिनेमाचे राईट्स 100 कोटींमध्ये विकले गेले आहेत. याआधी शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात या सिनेमाने 640 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1160 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुखच्या 'पठाण', 'जवान' या सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे. आता त्याचा 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे.
'डंकी' या सिनेमात शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन ईरानी आणि सतीश शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'डंकी'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.