Shah Rukh Khan Controversy: अनंत - राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात शाहरुखने केला अभिनेता रामचरणचा अपमान, नेटकरी संतापले

स्टेजवर बोलवताना शाहरुखने राम चरणचा उल्लेख इडली असा केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी शाहरुख खानवर संताप व्यक्त केला आहे.

Shah Rukh Khan Controversy: अनंत - राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात शाहरुखने केला अभिनेता रामचरणचा अपमान, नेटकरी संतापले
Shah Rukh Khan (PC - Facebook)

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगच्या शाही सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोहळ्यात बॉलिवूड आणि इतर सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. या प्री-वेडिंग कार्यक्रमामधील एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने (Shah Rukh Khan) दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा अपमान केला असल्याचा आरोप होत आहे. स्टेजवर बोलवताना शाहरुखने राम चरणचा (Ram Charan) उल्लेख इडली असा केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी शाहरुख खानवर संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Mukesh Ambani Emotional Moment: मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; अनंत अंबानीने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये सांगितली तब्येतीची समस्या (Watch Video))

राम चरणची मेकअप आर्टिस्ट जेबा हसन हिने  आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शाहरुखच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुखने राम चरणला स्टेजवर बोलवताना बेंड, इडली वडा राम चरण कहाँ है तू असे विचारले. राम चरण सारख्या स्टारबद्दल इतके अपमानास्पद!अशी पोस्ट जेबाने आपल्या इन्टा स्टोरीमध्ये लिहिली.

पाहा पोस्ट -

झेबा हसनने पुढे तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यामध्ये दक्षिणेकडील कलाकारांचे कौतुक किंवा आदर कसा केला जात नाही, त्यांच्याबद्दल दुजाभाव केला असल्याकडे बोट दाखवले. जेबाने म्हटले की,'हे विचित्र आहे की प्रत्येकजण आम्हाला कमी पैसे देऊ इच्छितो कारण आम्ही दक्षिण भारतातील आहोत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2024 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).