पहिल्या भेटीत शाहरुख खान याने प्रियांका चोप्रा हिला विचारला होता लग्नाबद्दलचा 'हा' प्रश्न (Video)
पहिल्या भेटीत शाहरुख खान याने प्रियांका चोप्रा हिला विचारला होता लग्नाबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आला होता.
देसी गर्ल म्हणून ओळखणाऱ्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचे निक जोनस (Nick Jonas) सोबत लग्न झाले आहे. तसेच निक आणि प्रियांका एकमेकांसोबत नेहमी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत असल्याचे दिसून येतातय तत्पूर्वी प्रियांका चोप्रा हिच्या लग्नापूर्वीच्या अफेरच्या चर्चा खुप रंगल्या होत्या. मात्र पहिल्या भेटीत शाहरुख खान याने प्रियांका चोप्रा हिला विचारला होता लग्नाबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आला होता.
तर डॉन चित्रपटाच्या शुटींगवेळी शाहरुख आणि प्रियांका चोप्रा यांचे अफेअर सुरु असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण दोघांनी याबद्दल कधी खुलासा केला नाही. तसेच बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यापूर्वी शाहरुख आणि प्रियांका यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
मिस फेमिनामध्ये प्रियांका चोप्रा ही विजेती ठरली होती. त्यावेळी शाहरुख हा मिस फेमिना स्पर्धेच्या परिक्षकांमधील एक होता. प्रियांका चोप्रा ही या स्पर्धेत विजयी झाल्यावर तिला शाहरुख कडून लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मला एका खेळाडू सोबत लग्न करायला आवडेल असे प्रियांका हिने उत्तर दिले होते.(Cannes Film Festival 2019: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा कान्स फिल्मफेस्टिव्हल मधील रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल Video)
तर 2000 रोजी पार पडलेल्या या मिस फेमिना स्पर्धेचे सुत्रसंचालन मलायका अरोरा हिने केले होते. तसेच मिस वर्ल्डचा पुरस्कार जिंकल्यानंतर प्रियांका हिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले होते.