Jawan Song Chaleya Teaser: 'जवान' चित्रपटातील शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज, Watch
दुसरीकडे, चाहत्यांची उत्कंठा दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी शाहरुख-नयनताराच्या रोमँटिक गाण्याचा 'चलेया'चा टीझर रिलीज केला आहे.
Jawan Song Chaleya Teaser: बॉलिवूड अभिनेत्री शाहरुख खान (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास महिना उरला असला तरी सोशल मीडियावर 'जवान'ची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दुसरीकडे, चाहत्यांची उत्कंठा दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी शाहरुख-नयनताराच्या रोमँटिक गाण्याचा 'चलेया'चा टीझर रिलीज केला आहे.
'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खान 'जवान'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी अॅक्शनपॅक्ड चित्रपटातील 'जिंदा बंदा' हे पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी प्लेलिस्टमधून दुसरे गाणे 'चलेया' रिलीज करण्याची घोषणा केली आहे. हे गाणे 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चाहत्यांना गाण्याची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. (हेही वाचा - Jawan Movie Clips Leaked: शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या क्लिप ट्विटरवर लीक, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल)
व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि नयनताराची गोड केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघेही जहाजावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. 'जवान'चे दिग्दर्शन अटली कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान यांनी केली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगू सामग्रीसह प्रदर्शित होणार आहे. 'जवान' हा अॅटली आणि शाहरुख खानचा एकत्र पहिला प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाद्वारे अॅटली कुमारही दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.