Pathan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि जॉन अब्राहम 'पठाण’ चित्रपटात एकत्र झळकणार

प्राप्त माहितीनुसार, शाहरुख खान यशराज फिल्म्स च्या 'पठाण’ या चित्रपटात (Pathan Movie) दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेता जॉन अब्राहमदेखील (John Abraham) महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.

Shah Rukh Khan, John Abraham (PC - Facebook, Instagram)

Pathan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी प्रोजेक्टविषयी नुकतीच माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, शाहरुख खान यशराज फिल्म्स च्या 'पठाण’ या चित्रपटात (Pathan Movie) दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेता जॉन अब्राहमदेखील (John Abraham) महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.

यशराज फिल्मला लवकरच 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित करणार आहे. यासंदर्भात फिल्म फेअरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. यात पठाण चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. (हेही वाचा -Car Accident: ऋतिक रोशन च्या 'लक्ष्य' चित्रपटातील कर्नल मनीष सिंह चौहान यांचा रस्ते अपघातात मृत्यू)

पठाण चित्रपट हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात शाहरुख खान या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करण्याची शक्यता आहे. तसेच सत्यमेव जयते कार्यक्रमाचं काम संपल्यानंतर जॉन अब्राहम मार्चमध्ये शुटिंगला सुरूवात करणार आहे.