Ira Khan-Nupur Shikhare Wedding Reception: आमिर खानची मुलगी आयराच्या रिसेप्शनला शाहरुख-गौरीने लावली हजेरी; सलमान खाननेही वेधल लक्ष

आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानचे अनिल कपूर, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ, कंगना राणौत, कार्तिक आर्यन, निर्माता रवी भागचंदका, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, एआर रहमान, दिलीप जोशी, स्मृती इराणी, धर्मेंद्र आदी सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

Shah Rukh-Gauri attend Ira Khan reception (PC - Instagram)

Ira Khan-Nupur Shikhare Wedding Reception: उदयपूरमध्ये आमिर खान (Aamir Khan) आणि रीना दत्ताची (Reena Dutta) मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांच्या शाही विवाहानंतर आता मुंबईत त्यांचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. आयराने प्रथम 3 जानेवारीला नोंदणीकृत विवाह केला. त्यानंतर 10 जानेवारीला उदयपूरमध्ये शाही विवाह केला. या रिसेप्शनमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांनीही या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर गाठले. शाहरुख खान आणि सलमान खानचे आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

आयराच्या रिसेप्शनला शाहरुख-गौरीने लावली हजेरी -

आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीला रात्री उशिरापर्यंत स्टार्संनी हजेरी लावली. या पार्टीत आमिर खानचे मित्र शाहरुख खान आणि सलमान खान उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये शाहरुख खान आमिर खान, गौरी खान आणि नुपूर शिखरेच्या आईसोबत पोज देताना दिसत आहे. गौरी खान मरून एम्ब्रॉयडरी सूटमध्ये ग्लॅमरस दिसत होती. (हेही वाचा - Ira Khan-Nupur Shikhare Wedding Reception: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला सचिन तेंडुलकर, इम्रान खान, अनिल कपूर आणि इतर स्टार्सचे आगमन)

पहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिर खानच्या पार्टीत सलमान खान -

आमिर खानची मुलगी आयराच्या रिसेप्शनमध्ये सलमान खान ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. सलमानने उपस्थित पापाराझींसमोर पोज दिली. अभिनेत्याने पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष वेधले.

आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानचे अनिल कपूर, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ, कंगना राणौत, कार्तिक आर्यन, निर्माता रवी भागचंदका, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, एआर रहमान, दिलीप जोशी, स्मृती इराणी, धर्मेंद्र आदी सेलिब्रिटी सहभागी झाले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif