SatyaPrem Ki Katha: 'सत्यप्रेम की कथा', कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची प्रेक्षकांना भुरळ; घ्या जाणून

कार्तिक आणि कियारा या जोडीने या आधी 'भूल भुलैया 2' मधून धमाल केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात COVID-19 महामारी आली आणि चित्रपटक्षेत्र काहीसे झाकोळले गेले. कोरोना काळानंतर ही जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

SatyaPrem Ki Katha | (Photo credit- Twitter)

Satyaprem Ki Katha Collection: कार्तिक आर्यन (Kiara Advani) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या 'सत्यप्रेम की कथा' (SatyaPrem Ki Katha) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. उल्लेखनीय असे की, पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचा गल्ला सुरुवातीला काहीसा रिकामा राहीला मात्र सायंकाळपर्यंत चित्रपटाने सर्व कसर भरुन काढली. सद्या बॉक्स ऑफीसवर चित्रपट चांगला गल्ला जमवत असल्याचे वृत्त आहे. कार्तिक आणि कियारा या जोडीने या आधी 'भूल भुलैया 2' मधून धमाल केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात COVID-19 महामारी आली आणि चित्रपटक्षेत्र काहीसे झाकोळले गेले. कोरोना काळानंतर ही जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'सत्यप्रेम की कथा' देशभरात सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये पोहोचली आहे. चित्रपटातील स्टार कास्टही एकदम तगडी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून लोकांना अधिक आशा आहे. परिक्षकांनीही चित्रपटाला आणि कलाकारांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही गल्ला खेचण्यासाठी चित्रपट यशस्वी राहील असे अनेकांना वाटते.

बॉक्स ऑफीसवरील गल्ला विचारात घ्यायचा तर हातील आलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी चित्रपटाने 9.25 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. निर्मात्यांनी कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'सत्यप्रेमक की कथा' बकरीदच्या दिवशी प्रदर्शित केला. बकरीद आणि शनीवार रविवार जोडून आल्याने अनेकांसाठी हा आठवडा दीर्घ सुट्टीचा गेला. त्याचाही चित्रपटाच्या गल्ल्यावर चांगला परिणाम झाल्याचे पाहायाल मिळाले. अजूनही चित्रपटाकडे पुढचे चार-पाच दिवस गल्ला करण्यासाठी चांगली संधी आहे. (हेही वाचा - Who is Neelam Gill: नीलम गिल कोण आहे? भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत आहे हॉलिवूड स्टार Leonardo DiCaprio's)

ट्विट

चित्रपटातील कलाकार

सत्यप्रेम की कथा चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय सुप्रिया पाठक कपूर (Supriya Pathak Kapur), गजराज राव (Gajraj Rao), सिद्धार्थ रंधेरिया ( Siddharth Randheria), अनुराधा पटेल (Anooradha Patel), राजपाल यादव (Rajpal Yadav) , निर्मिते सावंत (Nirrmite Saawaant) आणि शिखा तलसानिया (Shikha Talsania) यांचाही समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now