Satish Kaushik Death: 'मै मरना नहीं चाहता, मुझे बचा लो', सतिश कौशिक यांंच्या मॅनेजरने सांगितले त्यांचे शेवटचे शब्द

त्यांनी जेव्हा सतिश कौशिक यांची प्रकृती खराब असल्याची माहिती असल्याची माहिती पत्नीला दिल्यानंतर त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता.

Satish K | Twitter/ANI

जेष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडला धक्का बसला आहे. बुधवारी रात्री ह्रदयविकाराचा झटका आल्याने सतीश कौशिक यांचं निधन झालं होते. यावेळी त्यांचा मॅनेजर संतोष रॉय हे त्यांच्या सोबत होते त्यांनी सतिश कौशिक यांना घरुन रुग्णालयात नेले होते. बुधवारी रात्री सतिश कौशिक आपला 'कागज 2' चित्रपटावर काम करत होते. त्यांना तो चित्रपट एडिट करायचा होता. पण अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी संतोष राय यांना फोन केला आणि आपल्याला त्रास होत असून रुग्णालयात नेण्यास सांगितले. यानंतर त्यांना कारमधुन रुग्णालयात नेत असताना त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि "मैं मरना नही चाहता, मुझे बचा लो" असे त्याच्या मॅनेजरला म्हणाले. मला माझ्या बायको आणि मुलासाठी जगायचे आहे असे देखील त्यांनी म्हटले. पंरतू रुग्णालयात पोहचण्यापुर्वींच त्यांची प्राणज्योत माळवली. (Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांची 15 कोटींसाठी हत्या? आर्थिक वादातून आपल्या पतीने हत्या केल्याचा महिलेचा दावा)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोष राय यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला. संतोष राय गेल्या 34 वर्षांपासून सतीश कौशिक यांच्यासोबत होते. त्यांनी जेव्हा सतिश कौशिक यांची प्रकृती खराब असल्याची माहिती असल्याची माहिती पत्नीला दिल्यानंतर त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. यानंतर त्यांनी सतिश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांना फोन करुन सांगितलं. अनुपम खेर आणि बोनी कपूर सतीश कौशिक यांच्या निवासस्थानी काही मिनिटात पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते तिथे होते," अशी माहिती संतोष राय यांनी दिली आहे.