सारा अली खान 'या' आजाराने त्रस्त

सारा अली खान 'या' आजाराने भयंकर त्रस्त आहे.

सारा अली खान ( फोटो सौजन्य- इंन्स्टाग्राम )

बॉलिवूडमध्ये स्टार किड म्हणून पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) लवकरच 'केदारनाथ' या तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तसेच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सारा अली खान आजारी पडल्याचे ही कळले होते. त्यामुळे सारा अली खान 'या' आजाराने भयंकर त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.

सारा तिच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच वस्त आहे. या धावपळीत तिचे तिला आजारपण त्रास देत आहे. साराला पीसीओडी हा आजार असून तिला पोटदुखीचा भयंकर त्रास होत असल्याचे तिने एका शो मध्ये सांगितले होते. पीसीओडी (PCOD) मध्ये पाळीचे चक्र बिघडल्याने महिलांना हा त्रास सहन करावा लागतो. तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी साराने 100 किलो असलेले वजन कमी केले आहे. मात्र वजन कमी करताना साराला खूप त्रास झाल्याचे ही तिने सांगितले आहे.

तर पॉलिस्टिक ओव्हरी डिसीजचा त्रास असलेल्या महिलांना वजन कमी करण्यास फार त्रास होतो. त्यामुळे महिलांनी या आजारपणाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.