Sara Ali Khan ने वाढदिवसानिमित्त शेअर केला तिचा 26 वर्षांचा प्रवास (Watch Video)

वाढदिवसानिमित्त तिच्यावर सेलिब्रिटी, चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिचा आज 26 वा वाढदिवस (Birthday) आहे. वाढदिवसानिमित्त तिच्यावर सेलिब्रिटी, चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास दिवशी साराने आपला 26 वर्षांचा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. लहानपणापासून ते आतापर्यंतच्या फोटोजचा कोलाज पाहण्यासारखा आहे. चाहत्यांच्या हा व्हिडिओ नक्कीच पसंतीस पडेल. (सारा अली खान हिने घेतला देवी कामाख्याचा आशीर्वाद पण नेटकऱ्यांनी धर्मावरुन उपस्थितीत केले प्रश्न)

या व्हिडिओत साराच्या जन्मापासून ते आतापर्यंतचे फोटोज पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये तिचे कुटुंबिय, मित्रपरीवार देखील दिसत आहेत. चाहते या व्हिडिओला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना "25 वर्ष पूर्ण. जगणं, हसणं आणि प्रेमाची 26 वर्ष", असं कॅप्शन दिलं आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा लवकरच अक्षय कुमार आणि धनुष यांच्या 'अतरंगी रे' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यापूर्वी 'सिम्बा', 'कुली नं. 1', 'लव आज कल' यांसारख्या सिनेमांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसंच सोशल मीडियावर देखील ती प्रचंड अॅक्टीव्ह असते. (Sara Ali Khan Hot Bikini Photos: सारा अली खान निळ्या बिकिनीतील हॉट फोटोजनी चाहत्यांवर घातली मोहिनी, पाहा मालदिव्समधील तिचे Sexy Pics)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने साराने आसाम मधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळेस तिला धर्मावरुन प्रश्न उपस्थित करत ट्रोल करण्यात आले होते.