सारा अली खान हिच्या ड्रायव्हरला कोरोना व्हायरसची लागण; सारा सह कुटुंबियांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह
खुद्द साराने याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. ड्रायव्हर कोरोना बाधित असल्याने सारा सह कुटुंबियांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान संपूर्ण परिवाराचा कोविड-19 चा रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे समोर आले आहे.
Sara Ali Khan Driver Tested Corona Positive: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. खुद्द साराने याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. ड्रायव्हर कोरोना बाधित असल्याने सारा सह कुटुंबियांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान संपूर्ण परिवाराचा कोविड-19 (Covid-19) चा रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे समोर आले आहे. साराने सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबई महानगरपालिकेला धन्यवाद दिले आहेत.
साराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, "माझा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. बीएमसीला या संदर्भात माहिती देण्यात आली असून त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. माझे कुटुंब, इतर स्टाफ आणि माझी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे आणि आम्ही सर्वजण योग्य ती खबरदारी घेत आहोत. बीएमसीच्या मदतीने आणि मार्गदर्शनासाठी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांकडून त्यांचे मनापासून आभार." (सारा अली खान हिची भाऊ इब्राहीम अली खान सह विकेंडची हेल्थी सुरुवात; सायकलिंग करतानाचे फोटोज सोशल मीडियावर केले शेअर, View Pics)
पहा पोस्ट:
साराच्या या पोस्टवर चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच त्यांना सुरक्षित राहण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लव आज कल' या सिनेमाद्वारे सारा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही फ्रेश जोडी पडद्यावर झळकली होती. इम्तियाज अली दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. सध्या सारा 'कुली नंबर 1' आणि 'अतरंगी रे' या सिनेमांवर काम करत आहे.