सारा अली खान चे लेहंग्यातील बालपणीचे Cute फोटोज सोशल मिडियावर व्हायरल, चाहत्यांनी कमेंट्समधून केला कौतुकाचा वर्षाव
Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडपेक्षा सोशल मिडियावर चर्चेत असलेली सैफ अली खान यांची कन्या सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. सारा आपल्या सोशल अकाउंटवरून आपले अनेक व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असते. ती सोशल मिडियावर अशा माध्यमातून बरीच सक्रिय असल्या कारणाने चाहतेही तिच्या पोस्ट ला भरभरुन प्रतिसाद देतात. तिचे हॉट, सेक्सी फोटोज पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ होतात. मात्र सध्या तिचे चाहते घायाळ झालेत ते तिचे हॉट फोटो नाही तर बालपणीचे खूप क्युट फोटोज. हे फोटोज आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले आहेत.

या फोटोंमध्ये साराने वेगवेगळे घागरे, शरारे परिधान केले आहेत. त्यात तिचा साजशृंगार आणि गोंडस चेहरा तिच्या सौंदर्याला चार चांद लावत आहेत.

 

View this post on Instagram

 

Waiting for my shot since 2000 ⏰ 🎥 🎬🔌🔜🙇🏻‍♀️#apnatimeayega #tbt #sarakadrama

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

हेदेखील वाचा- अभिनेत्री सारा अली खानच्या या कृत्यामुळे आई अमृता सिंग ला लपवावे लागले आपले तोंड, Watch Video

हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी, 'तू भारताचे खरं सौंदर्य आहेस,' 'आजच्या दिवसाचा सर्वात क्युट फोटो' यांसारखे अनेक कमेंट्स दिले आहेत.

नुकतेच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या ब्रेकअपच्या चर्चा कानावर आल्या. ही बातमी खरी आहे की नाही माहित नाही मात्र मध्यंतरी कार्तिक आर्यन चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसोबत डेटला गेलेला पाहायला मिळाला. त्यामुळे सारा आणि कार्तिकचे ब्रेकअप झाले असे त्यांच्या चाहत्यांनी मनात पक्के केले.