Sapna Choudhary Video: सपना चौधरी आई बनल्यानंतर तिचा नवा अवतार आला समोर, हरयाणवी डान्सरचा नवा व्हिडिओ आला समोर

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sapna Choudhary (Photo Credits: Instagram)

Sapna Choudhary Dance Video: हरयाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) हिला अलीकडेच पुत्ररत्नाचा लाभ झाला. तिच्या आई होण्याच्या बातमीने सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या लग्नाला घेऊन देखील अनेक चर्चा रंगल्या. यावर नेटक-यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. यावर तिच्या नव-याने देखील या सर्वांना चोख उत्तर दिले. आई झाल्यानंतर सपना झगमगत्या दुनियेपासून थोडी लांबच होती. मात्र नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सपना आई झाल्यानंतर कशी दिसते हे दिसत आहे.

इंटरनेटवर सपनाचा एक नवा व्हिडिओ (Sapna Choudhary Viral Video) आला आहे. यात सपना आई झाल्यावर किती वेगळी दिसते हे स्पष्ट दिसत आहे. यात तिचे वजनही वाढल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmi Singh (@officialrashmisinghh)

कपाळावर कुंकू, ओठांवर लिपस्टिक, गळ्यात मंगळसूत्र असा तिचा एक वेगळाच लूक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.हेदेखील वाचा- Sapna Choudhary Baby Boy Photo: बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि हॉट डान्सर सपना चौधरी हिच्या बाळाचा पहिला फोटो झाला व्हायरल, Cuteness ने जिंकली अनेकांची मनं

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

निश्चितच सपना आपल्या डान्स स्टेजला खूप मिस करत असणार. आपल्या नृत्याविष्काराने तिने आपला चाहतावर्ग बनवला आहे. अलीकडेच तिने आपला एक डान्स व्हिडिओ शेअर करत 'वेलक अगेन टू मी' असे कॅप्शन लिहिले आहे.