संजय दत्त याच्या चित्रपटात काम करण्याची संधी, मान्यता दत्त हिने केला खुलासा

बॉलिवूडमधील कलाकार संजय दत्त (Sanjay Dutt) याच्या चाहत्यांसाठी आणि स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांसाठी खुशखबर आहे. कारण संजय प्रोडक्शन (Sanjay Production) कंपनीकडून संजय सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचसोबत संजय दत्त याची पत्नी मान्यता (Manyata Dutt) हिला सुद्धा भेटण्याची संधी देण्यात येणार आहे.

संजय दत्त आणि मान्यता दत्त (Photo Credits- Instagram)

बॉलिवूडमधील कलाकार संजय दत्त (Sanjay Dutt) याच्या चाहत्यांसाठी आणि स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांसाठी खुशखबर आहे. कारण संजय प्रोडक्शन (Sanjay Production) कंपनीकडून संजय सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचसोबत संजय दत्त याची पत्नी मान्यता (Manyata Dutt) हिला सुद्धा भेटण्याची संधी देण्यात येणार आहे. मात्र यासाठी चाहत्यांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक खुलासा मान्यता हिने सोशल मीडियात केला आहे.

मान्यता हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, ''तुम्हाला तुमचे नशीब आजमण्याची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे संजय दत्त याच्या पुढील चित्रपटासाठी करण्यात येणाऱ्या ऑडिशनसाठी संधी तुम्हाला मिळू शकणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला संजयचा चित्रपट 'प्रस्थानम' पाहणे गरजेचे आहे. त्याचसोबत तुम्हाला चित्रपटातील 10 पॉवरफुल डायलॉग्स आणि चित्रपटाचे तिकिट sanjaysduttproductions@gmail.com वर पाठवणे अत्यावश्यक आहे. यानुसार खऱ्या हुन्नरी व्यक्तीला मला भेटण्याची संधी मिळणार असून चित्रपटात काम सुद्धा मिळणार आहे. अपेक्षा आहे तुम्हाला संजयचा हा चित्रपट नक्की आवडेल.''

 

View this post on Instagram

 

Here's an opportunity for you all to build your own legacy! Stand a chance to audition with @sanjaysduttprod for one of our future projects. All you have to do is go watch #Prassthanam and email us 10 most powerful dialogues of the film along with your movie ticket on sanjaysduttproductions@gmail.com 📧 the rightful talent gets to meet me along with an opportunity to be cast.Hope you all enjoy the film 😇🙏 #love #grace #positivity #dutts #beautifullife #thankyougod🙏

A post shared by Maanayata Dutt (@maanayata) on

सध्या मान्यता सुद्धा संजय दत्त याला सुद्धा त्याच्या कामात मदत करत आहे. अशा स्थितीत मान्यता तिच्या युनिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरुन 'प्रस्थानम' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.(संजय दत्त याचा पहिला मराठी सिनेमा 'बाबा'ची थेट 'गोल्डन ग्लोब'मध्ये भरारी)

या चित्रपटात संजय दत्त याच्यासोबत जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, मनीषा कोइराला, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांनी भुमिका साकारल्या आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टा यांनी केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now