बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर संजय दत्त ची मुलगी त्रिशाला ने सोशल मीडियावर व्यक्त होत भावनांना करुन दिली मोकळी वाट; पहा तिची Emotional Post
त्यामुळे सध्या ती कठीण परिस्थितीतून जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची मोठी मुलगी त्रिशाला दत्त (Trishala Dutt) हिच्या बॉयफ्रेंडचे अचानक निधन झाले. त्यामुळे सध्या ती कठीण परिस्थितीतून जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 31 वर्षीय त्रिशाला ने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, "माझं हृदय तुटले आहे. नेहमी माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, माझी रक्षा केल्याबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल तुझे आभार. तू मला खूप खूश ठेवलेस. तुला भेटल्याने मी जगातील सर्वात नशीबवान मुलगी असल्यासारखे मला वाटू लागले. तू माझ्यात नेहमीच जिवंत राहशील. मी तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहीन आणि जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत तुला मिस करेन. मी कायमची तुझीच झाले आहे."
त्रिशाला दत्त हिची भावनिक पोस्ट:
त्रिशाला हिच्या या भावनिक पोस्टमधून तिच्या मनातील दुःख, सल व्यक्त होते. बॉयफ्रेंडच्या निधनाने तिला संपूर्ण हादरवून सोडले आहे. तिच्या या भावूक पोस्टवर नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रीया येत आहे. अनेकजण तिच्या भावना समजून घेताना दिसत आहेत.
त्रिशाला ही संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी आहे. त्रिशाला 8 वर्षांची असताना ऋचाचे निधन झाले होते.