Salman Khan Official Notice: कास्टिंग कॉलसाठी सलमान खानचं नाव वापरणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा; कास्टिंग कॉलबाबत दिली 'ही' सूचना
आता अलीकडेच सलमान खान फिल्म्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन जारी करून चाहत्यांना इशारा दिला आहे.
Salman Khan Official Notice: मायानगरी मुंबईत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या लोकांना अनेकवेळा फसवणूकीचा सामना करावा लागतो. काही लोक कधी सलमान खान (Salman Khan)च्या टीमचे कास्टिंग सदस्य असल्याचे भासवतात तर कधी करण जोहरच्या टीमकडून असल्याचे सांगून पैसे उगळतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री डोनल बिश्तला एक बनावट मेल आला होता, ज्यामध्ये करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव लिहिले होते. आता अलीकडेच सलमान खान फिल्म्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन जारी करून चाहत्यांना इशारा दिला आहे.
सलमान खानचे 'सलमान खान फिल्म्स' नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यामध्ये त्याने हीरो आणि किसी का भाई किसी की जान सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. सलमान खान फिल्म्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक नोटीस जारी करून लिहिले की, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की सलमान स्वत: किंवा सलमान खान फिल्म्स या क्षणी कोणतीही कास्टिंग करत नाही. आम्ही भविष्यात कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती केलेली नाही. तुम्हाला यासंबंधीचा कोणताही मेल किंवा मेसेज आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. कुठेही चुकीच्या पद्धतीने नाव वापरल्यास मिस्टर खान किंवा एसकेएफ फिल्म्सवर कायदेशीर कारवाई केली जाईल." (हेही वाचा - Driver Cheated Rakhi Sawant: राखी सावंतची ड्रायव्हरकडून फसवणूक, फोन आणि लाखो रुपये घेऊन झाला फरार; चाहते म्हणाले, 'पगार दिला नसेल')
दरम्यान, 2020 च्या सुरुवातीला देखील अशी अफवा पसरली होती की सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट करत आहे आणि त्याने एजंटची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यावेळी सलमान खानने सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे सांगत ताकीद दिली. सलमान खानच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो बिग बॉस ओटीटी सीझन 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
किसी का भाई किसी की जान नंतर तो पुन्हा एकदा टायगर 3 मध्ये रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.