Salman Khan च्या 'Radhe: Your Most Wanted Bhai' चित्रपटाने प्रदर्शनाआधीचं कमवले 230 कोटी

कोरोना साथीच्या काळात चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीलाही अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशात सध्या सलमानचा चित्रपट करार बॉलीवूडमधील सर्वात महाग आणि मोठा सौदा मानला जात आहे.

सलमान खान (Photo Credits: Instagram)

Salman Khan Film 'Radhe: Your Most Wanted Bhai': एक यशस्वी अभिनेता तसेच एक उत्तम उद्योगपती म्हणून सलमान खानकडे (Salman Khan) पाहिलं जाते. अभिनयाव्यतिरिक्त निर्माता आणि चित्रपट वितरक म्हणून त्यांने बरीच कमाई केली आहे. सलमानने आपल्या आगामी ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचे राइट्स महागड्या किंमतीत विकले आहेत. या चित्रपटाचे म्यूजिकचे सॅटॅलाइट, डिजिटल आणि थिएट्रिकल राइट्स (भारत आणि जागतिक) झी स्टुडिओला 230 कोटींमध्ये विकले गेले आहे. कोरोना साथीच्या काळात चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीलाही अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशात सध्या सलमानचा चित्रपट करार बॉलीवूडमधील सर्वात महाग आणि मोठा सौदा मानला जात आहे. यापूर्वी सलमानचे 'रेस 3', 'दबंग 3' आणि 'भारत' चित्रपटदेखील झी वाहिन्यांवर प्रसारित झाले होते. (वाचा - Grammy Awards 2021: कोरोना महामारीमुळे 'ग्रॅमी पुरस्कार' पुढे ढकलला; आता 'या' तारखेला होणार कार्यक्रमाचे आयोजन)

अलीकडेच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमानने हे स्पष्ट केलं होते की, जर चित्रपटाचे काम वेळेवर पूर्ण झाले आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली तर ईद 2021 च्या निमित्ताने तो हा चित्रपट प्रदर्शित करेल. प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट ईद 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना साथीमुळे आणि लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. (BMC: अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय? घ्या जाणून)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या चित्रपटाविषयी बोलताना सलमान म्हणाला की, लोकांचे आरोग्य त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे परिस्थिती ठीक झाल्यावरचं तो आपला चित्रपट प्रदर्शित करेल. जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकतील. या चित्रपटामध्ये सलमानबरोबर दिशा पटानी आणि रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.