सलमान खान लवकरच साकारणार शिख पोलिसाची भूमिका; आयुष शर्मा गँगस्टर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला

दबंग 3 सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खान राधे सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सोबतच सलमान अजून एका नव्या प्रोजेक्टवर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Salman Khan (Photo Credits: Youtube)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या नव्या सिनेमाबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे. 'दबंग 3' (Dabangg 3) सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खान 'राधे' (Radhe) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, राधे सिनेमा सोबतच सलमान अजून एका नव्या प्रोजेक्टवर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. यात सलमान बहिण अर्पिता खान-शर्मा हिचा नवरा आयुष शर्मा (Aayush Sharma) याच्यासोबत काम करत आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या सिनेमात सलमान खान शिख पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन लवयात्री (Loveyatri) सिनेमाचे दिग्दर्शक अभिराज मिनावाला करत आहेत.

यापूर्वी सलमान खान अनेकदा पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. मात्र यात तो शिख पोलिसाची भूमिका साकारत आहे. तर आयुष शर्मा नार्थ इंडियन गँगस्टर म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ('कभी ईद कभी दिवाली' चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री)

यापूर्वी सलमान खान 2008 मध्ये आलेल्या 'हिरो' सिनेमात शिख आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. तर 'दबंग', 'दबंग 2', 'दबंग 3', 'वॉन्डेट' आणि 'गर्व- प्राईड आणि ऑनर' या सिनेमांत त्याने पोलिस इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. मात्र या नव्या भूमिकेसाठी सलमान दाढी वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. सलमानचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना भावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ('दबंग 3' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिस कमावला 24 कोटींचा गल्ला)

सध्या सलमान खान 'राधे' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या सिनेमात त्याचासोबत दिशा पटानी प्रमुख भूमिकेत असणार आहे.