Salman Khan Post After Firing Outside Galaxy Apartment: निवासस्थानाबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानने शेअर केला पहिला व्हिडिओ; पहा व्हिडिओ
अभिनेत्याने सांगितले की, हा ब्रँड दुबईमध्ये उपलब्ध असेल.
Salman Khan Post After Firing Outside Galaxy Apartment: 14 एप्रिल रोजी सकाळी सलमान खान (Salman Khan) च्या मुंबईतील घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. वृत्तानुसार, ही घटना पहाटे 4:55 च्या सुमारास घडली, ज्यामध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत तीन ते चार गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सलमान खानने सोशल मीडियावर पहिल्यादा पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो त्याच्या 'बीइंग स्ट्राँग' ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. अभिनेत्याने सांगितले की, हा ब्रँड दुबईमध्ये उपलब्ध असेल. व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यावर प्रेमाने कमेंट बॉक्स भरून टाकला. एकाने लिहिले - करोडो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, भाऊची अपडेट्स देण्याची पद्धत जरा कॅज्युअल आहे.
दरम्यान, रविवारी, 14 एप्रिल रोजी घराबाहेर गोळीबाराची घटना घडली असतानाही सलमान खानने आपले काम सुरू ठेवण्याचा आणि आपल्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नवीन अहवालांनुसार, अभिनेता यामागे जबाबदार असलेल्यांकडे जास्त लक्ष देऊ इच्छित नाही आणि हल्ल्यानंतरही त्याचे काम चालू ठेवेल. (हेही वाचा - Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारा प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त केल्यानंतर दोन अज्ञात लोकांविरुद्ध FIR दाखल.)
तथापी, 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'सलमान त्याच्या आधीच ठरलेल्या चित्रपटांचे शूटिंग करणार आहे. तो या गोळीबाराच्या घटनेमागील लोकांवर लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. त्याऐवजी, त्याने चित्रपट सृष्टीतील मित्र आणि चाहत्यांना काळजी करू नका असे सांगितले आहे. शिवाय त्यांना गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये न जाण्याचं आवाहन केलं आहे.