Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज

या धमकीशी संबंधीत एक संदेश मुंबई पोलीस वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आला आहे.

Salman Khan, Lawrence Bishnoi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्यासोबत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ही धमकी आली आहे. ज्यामुळे खळबळ तर उडाली आहेच. पण, अभिनेत्याची सुरक्षा आणि आणि एकूणच वाढते गुन्हेगारी विश्व याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, आलेल्या धमकीच्या संदेशामध्ये म्हटले आहे की, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर मिटवायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. बिश्नोईच्या टोळीशी संबंध असल्याचा दावा करणारा आणि हा संदेश पाठवणारा कथीत व्यक्ती म्हणाला, "हे हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला वैर संपवून जिवंत राहायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. तसे न केल्यास त्याची अवस्था बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्यापेक्षाही वाईट होईल ".

बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खान यास धमकी

मुंबई पोलीस वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सलमान खान याच्यासाठी आलेला संदेश हा, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येचा संदर्भ देतो. त्यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असली तरी लॉरेन्स बिश्नोईचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचा थेट पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, या टोळीचा सहभाग अजूनही तपासाचा भाग आहे. (हेही वाचा, Somy Ali Writes to Lawrence Bishnoi: सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिचे लॉरेन्स बिश्नोई यास खुले पत्र, ' मुझे आपसे बात करनी है')

मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आलेल्या धमकीस मुंबई पोलीस अत्यंत गांभीर्याने घेत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी आणि सलमान खानची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण तपास सुरू आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी खंडणीच्या धोक्याचे मूळ शोधण्याचे काम करत असल्याने वाढीव सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी)

सलमान खान यास पुन्हा धमकी

लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत दीर्घकाळापासून वाद

लॉरेन्स बिश्नोई टोळी अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली आहे. काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित दीर्घकालीन द्वेषामुळे सलमान खान त्यांच्या रडारवर आहे. ज्यामध्ये अभिनेत्यावर लुप्तप्राय प्रजातीच्या हत्येचा आरोप होता. बिश्नोईने कथितपणे खानविरुद्ध वैयक्तिक सूड उगवताना दिसत आहे, ज्यामुळे अलिकडच्या काही काळात चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पुढे सरकत आहे. या धमकीच्या या प्रकरणाशी जबाबदार असलेल्यांना त्वरित पकडले जावे यासाठी मुंबई पोलीस विविध केंद्रीय यंत्रणाच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif