Salman Khan Case: सलमान खानला जीवे मारण्याचा कट; पोलिसांकडून 5 व्या आरोपीला अटक
सलमानवर गोळ्या चालविण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर करण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती नवी मुंबई पोलीसांनी अटक केलेल्या चार आरोपीकडून समोर आली होती.
अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील चार जणांना नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी अटक केली. पाचव्या अटक हरियाणातून करण्यात आली आहे. दीपक उर्फ जॉनी वाल्मिकी असे अटक आरोपीचे नाव आहे. नवी मुंबई पोलिसांच्या माहितीवरून हरियाणा पोलिसांनी वाल्मिकीला अटक केली आहे. सलमान खानवरील हल्ला प्रत्यक्षात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आणि आरोपींच्या राहण्याची व्यवस्था जॉनी वाल्मिकी करणार होता. जॉनी हा विडिओ कॉलद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. (हेही वाचा - Four Shooters Arrested by Panvel Police: सलमान खानवर हल्ल्याचा कट फसला, लॉरेन्स टोळीच्या 4 सदस्यांना अटक)
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिस चौकशीत त्यांचा आणखी एक साथीदार असल्याचे उघड केले. या कटात कोण सामील आहेत. आरोपीचा खुलासा झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी संपर्क साधून दीपक उर्फ जॉनी वाल्मिकी याची खबर दिली. यानंतर हरियाणा पोलिसांनी वाल्मिकीला भिवानी येथून अटक केली आहे. जो लवकरच हरियाणा पोलिस नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. सलमान खान याला गाडीत, घरात किंवा फार्महाऊसमध्ये घुसून अथवा शूटिंगस्थळी मारण्याचा बिष्णोई गँगचा प्लॅन होता. यासाठी सलमान खानची रेकी करण्यासाठी नवी मुंबई, ठाणेसह परराज्यातील 50 ते 60 जणांना यासाठी कामाला लावण्यात आले होते.
सलमानवर गोळ्या चालविण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर करण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती नवी मुंबई पोलीसांनी अटक केलेल्या चार आरोपीकडून समोर आली होती. आता याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून या कटासंदर्भात अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.