Salman Khan Death Threat: 'चूक झाली...'; सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी

सूत्रांनी सांगितले की, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले आणि दावा केला की तो सलमान आणि लॉरेन्समध्ये समेट घडवून आणेल.

Salman Khan (PC - Instagram)

Salman Khan Death Threat: गेल्या आठवड्यात ज्या व्यक्तीने अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई वाहतूक नियंत्रणाच्या व्हॉट्सॲप नंबरवर संदेश पाठवून धमकी दिली होती, त्याने आता माफी मागितली आहे. पोलिसांना पुन्हा एकदा त्याच व्हॉट्सॲप नंबरवरून आणखी एक मेसेज आला असून, ज्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, धमकीचा मेसेज त्याच्याकडून चुकून पाठवण्यात आला असून तो याबद्दल माफी मागत आहे.

हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे झारखंडमधील ठिकाण पोलिसांना सापडले असून, त्याच्या शोधात पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. सूत्रांनी सांगितले की, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले आणि दावा केला की तो सलमान आणि लॉरेन्समध्ये समेट घडवून आणेल.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आलेल्या धमकीच्या संदेशात, अभिनेता सलमान खानचे लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली होती. वांद्रे येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत, 18 ऑक्टोबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांना हा व्हॉट्सॲप संदेश मिळाला होता. त्यात म्हटले आहे की, ‘जर सलमान खानने सिद्दिकी यांच्या हत्येमागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीशी त्याचे भांडण संपवण्यासाठी 5 कोटी दिले नाहीत तर, त्याचेही राजकारण्याप्रमाणेच हाल होईल.’

धमकी देणाऱ्या मेसेजमध्ये म्हटले होते की, ‘हे हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचे असेल, तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील.’ या धमकीनंतर सलमान खानचे वांद्रे येथील निवासस्थान आणि मुंबईजवळील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसभोवती सुरक्षा वाढवण्यात आली. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर 13 ऑक्टोबर रोजी बिश्नोई टोळीतील एका संशयिताने या घटनेची जबाबदारी स्वीकारली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif