सलमान खान जेव्हा त्याच्या आईसोबत इंग्रजी गाण्यावर थिरकतो; पहा व्हिडिओ
तो सध्या नवेनवे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतो.
बॉलिवूडचा सुलतान सलमान खान आजकाल सोशल मीडियावर भलताच अॅक्टीव्ह आहे. तो सध्या नवेनवे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतो. आजच सलमान खानने आई सुशीला चरक सोबतचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सलमान खानच्या घरी असलेल्या पार्टीतील आहे. ज्यात सलमान खान आईसोबत डान्स करताना दिसत आहे.
आईसोबतचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सलमान खान याने लिहिले की, "आई सांगत होती की बंद करा हे नाच गाणे...!" आणि व्हिडिओच्या शेवटी त्याची आई म्हणते देखील बंद करा हे. (खास संदेशासह सलमान खान याचे हटके Bottle Cap Challenge)
पहा व्हिडिओ:
सलमान खानच्या चाहत्यांना हा व्हिडिओ भलताच आवडला आहे. केवळ चाहतेच नाही तर इतर बॉलिवूड कलाकारांनीही यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. वरुण धवनने खूप सारे हार्ट इमोजीच कमेंटमध्ये पाठवले आहेत. त्याचबरोबर कियारा आडवाणी आणि पलक मुछाल यांनी देखील या क्यूट व्हिडिओवर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. यापूर्वीही सलमान खान याने शेअर केलेल्या व्हिडिओज, फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला होता. सलमान खानची लोकप्रियता अफाट असून काही दिवसांपूर्वी त्याच्या दिव्यांग चाहतीने चक्क पायाने त्याचे चित्र काढले होते.
'भारत' सिनेमाच्या धडाकेबाज यशानंतर सलमान खान लवकरच सलमान 'दबंग 3' आणि 'इंशाअल्लाह' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.